त्या जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

कोपरगाव – कोपरगाव शहरातील हॉटेल न्यू सागरमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन त्यात एक महिला गंभीर जखमी झाली होती. आज (दि.25) या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोपरगाव शहरातील खंदकनाला येथील मेन रोड लगत हुरखॉं बसीरखॉं पठाण यांच्या मालकीच्या हॉटेल न्यू सागरला बुधवारी (दि. 24) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागली होती.

त्यात हॉटेलमध्ये काम करणारी शारदा नंदू मोरे (वय 45,रा. साईबाबा तपोभूमी) ही महिला 90 टक्के भाजली होती. प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी लोणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास या महिलेचा मृत्यू झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या महिले पश्‍चात पती, दोन मुले, असा पारीवार आहे. मयत शारदा मोरे या नव्यानेच कामावर रुजू झाल्या होत्या. कामाच्या दुसऱ्यात दिवशी दुर्दैवी घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)