रशियात गॅस स्फोटाने 12 मजली इमारत कोसळून 3 ठार 79 बेपत्ता

मॉस्को (रशिया): रशियात गॅस स्फोटाने एक 12 मजली इमारत कोसळून 3 ठार 79 बेपत्ता झाल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे. मॉस्कोपासून 1700 किमी अंतरावरील माग्नितोगोस्क या औद्योगिक शहरात ही दुर्घटना घडली. नववर्षाच्या रात्री एक वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला आणि बारा मजली इमारतीचा एक भाग कोसळला.

इमारत कोसळल्याने उणे 18 अंश सेल्सियस अशा रक्त गोठवणाऱ्या तापमानात असंख्य लोक बेघर झाले आहेत. अशा गोठवणाऱ्या थंडीतही पोलीस, बचावकर्मी आपले काम करत आहेत. आतापर्यंत इमारतीच्या ढिगाऱ्यामधून तीन जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले असून तीन मृतदेह हाती लागले आहेत. अद्याप 79 लोक बेपत्ता असल्याचे चेल्याबिस्कचे राज्यपाल बोरिस डबरोस्की यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

घटनेची गंभीरता लक्षात घेऊन अध्यक्ष पुतीन यांनी आपात्काल मंत्री येवगेनी जिनिवच आणि आरोग्य मंत्री वेरिनिका स्कोवत्सोर्वा यांना मदत आणि बचाव कार्यात जातिनिशी लक्ष देण्याचे आदेश दिले आहेत. गॅसस्फोट होणे ही रशियात नित्याची गोष्ट आहे. येथील पायाभूत सुविधा अगदी जुन्यापुराण्या असून सुरक्षा सोयींकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष केले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)