गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडियाच्या नोंदणी व प्रशिक्षण वर्गाला सुरुवात

पुणे – पुण्यातील जागतिक दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण देण्याच्या उद्येशानी गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडियाची सुरुवात झाली आहे. दक्षिण आफ्रिकेचे नामांकित खेळाडू असलेले गॅरी कर्स्टन यांनी भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून देखील काम पहिले आहे. विश्‍वचषक 2011 मध्ये भारतीय क्रिकेट संघच्या विजयामध्ये यांचा देखील मोलाचा वाटा आहे. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकाच्या जबाबदारी नंतर कर्स्टन यांनी आपले लक्ष कोचिंगच्या क्षेत्राकडे वळवले आहे.

गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडियाच्या समर कॅम्प व वार्षिक प्रशिक्षणासाठीची नाव नोंदणी येत्या 23 व 24 मार्च रोजी करण्यात येणार आहे. त्याचे प्रशिक्षण 4 एप्रिल पासून सुरु होणार आहे. समर कॅम्प, वार्षिक प्रशिक्षण, शनिवार- रविवार प्रशिक्षण, वैयक्तिक प्रशिक्षण व सांघिक प्रशिक्षण याची नाव नोंदणी या दरम्यान करण्यात येणार आहे.

या क्रिकेट प्रशिक्षणामध्ये 4 वर्षापुढील मुले व मुली सहभागी होऊ शकतात. गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडियाचे प्रशिक्षण केंद्र हे डिव्हिजनल स्पोर्टस कॉम्प्लेक्‍स, शास्त्री नगर, येरवडा, पुणे येथे असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)