गरवारे टेक्‍निकल फायबर्सच्या निर्यातीत भरीव वाढ

मुंबई – गरवारे टेक्‍निकल फायबर्सच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायाने वाढीमध्ये सातत्य असल्याचे कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक वायू गरवारे यांनी सांगितले.

ते म्हणाले की, आमच्या दोन पेटंटना मान्यता मिळाली असून, त्यांच्यामध्ये भविष्यात प्रचंड प्रगती करण्याची क्षमता आहे. कंपनीच्या तिसऱ्या तिमाहीत विक्रीमध्ये 10.3% म्हणजे 222.2 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली. या तुलनेत आर्थिक वर्ष 18 मधील तिसऱ्या तिमाहीत हे प्रमाण 201.5 कोटी रुपये होते. तिसऱ्या तिमाहीत करोत्तर नफ्यामध्ये14.2% म्हणजे 24.7 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली. या तुलनेत आर्थिक वर्ष 18 मधील तिसऱ्या तिमाहीत हे प्रमाण21.6 कोटी रुपये होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आर्थिक वर्ष 19 मधील 9 महिन्यांत निव्वळ विक्रीमध्ये 11.9% म्हणजे 728 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली. या तुलनेत आर्थिक वर्ष 18 मधील 9 महिन्यांत हे प्रमाण 650 कोटी रुपये होते. 9 महिन्यांत करपूर्व नफ्यामध्ये 17.1% म्हणजे 131.3 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली. आर्थिक वर्ष 18 मध्ये हे प्रमाण 12.1 कोटी रुपये होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)