गरिबांचा फ्रीज बाजारपेठेत दाखल

शहरासह ग्रामीण जनतेचा खरेदीकडे वाढता कल

सातारा – गत आठवडाभरापासून थंडीचे प्रमाण कमी झाले आहे तसेच उन्हाची तीव्रता वाढली आहे. वाढत्या गरमीमुळे नागरिकांचा थंड पेय, थंड पदार्थ खाण्याकडेही कल वाढू लागला आहे. विशेष म्हणजे उन्हाळ्याची चाहुल लागल्याने बाजारपेठेतही गरिबांचा फ्रिज अशी ओळख असलेल्या मातीच्या माठांची आवाक मोठ्या प्रमाणात झाली आहे. सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात माठ उपलब्ध झाले आहेत.

रथसप्तमी म्हणजेच ऋषीचे आठ दिवस चालणारे उपवासाचा सप्ताह सुरु होताच थंडीचे प्रमाण कमी होऊ लागते. उपवासाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच रथसप्तमीदिवशी सूयनारायण रथात बसतात आणि थंडीची तीव्रता कमी होऊन उन्हाळ्याची चाहूल सुरु होते. गेल्या आठवड्यातच रथसप्तमी झाली आणि उन्हाची तीव्रताही वाढू लागली. गेल्या दोन तीन दिवसांपासून दिवसभर तीव्र स्वरुपाचे उन पडत आहे. शहरासह ग्रामीण भागातील लोकांनीही थंडीत वापरत असलेले उबदार कपडे आता कपाटात ठेवण्यास सुरुवात केली आहे. तसेच दिवसभर फॅन, एसी सुरु झाले आहे. त्याचप्रमाणे रात्रीच्यावेळीही गरमीमुळे फॅन, एसी लावल्याशिवाय झोप लागत नसल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उन्हाची दाहकता कमी करण्यासाठी दिवसा विशेषत: दुपारच्यावेळी गोळा, आईस्क्रीम खाण्यासाठी तसेच थेड पेय पिण्यासाठी नागरिकांची हॉटेल्स, आईस्क्रीमच्या गाड्यांवर गर्दी होऊ लागली आहे. त्याचप्रमाणे घरातील पाणीही थंड ठेवण्यासाठी कुणी फ्रीज खरेदी करत आहे तर शहरासह ग्रामीण भागातील लोक गरिबांचा फ्रीज अशी ओळख असणारे मातीचे माठ खरेदी करु लागले आहेत. त्याचप्रमाणे नागरिकांची गरज ओळखून विक्रेत्यांनीही बाजारपेठेत आधीच माठांची वेगवेगळ्या रंगातील व आकारातील आवक वाढविली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)