सारसबागेत सर्वत्र कचराच-कचरा

पुणे – दीपोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांनी सारसबागेत प्रचंड गर्दी केली होती. बाहेर फटाके फोडण्यास आणि कचरा करण्यास सक्त मनाई आहे. असे असतानाही आकाशात उडणाऱ्या फटाक्‍यांची आतषबाजी यावेळी करण्यात आली. तसेच नागरिकांनी कागद, प्लॅस्टिक पिशव्या टाकल्यामुळे बागेमध्ये कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. त्याचा त्रास उद्यान विभागाला आणि विशेषत: कचरा साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना होणार आहे.

दिवाळी, दीपोत्सव, दिवाळी पहाट, इ. चे आयोजन केले जाते. मात्र, बहुतांश कार्यक्रम मैदान, सभागृह किंवा नाट्यगृहांमध्ये होत असतात. तर काही कार्यक्रम हे उद्यानांमध्ये होत असतात. दरवर्षी सारसबागेत लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेला दीपोत्सवाचे आयोजन केले जाते. त्यासाठी शहरासह उपनगरातून मोठ्या संख्येने नागरिक येतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, शुक्रवारी (दि.9) नेहमीप्रमाणे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे पहाटे बच्चेमंडळींसह नागरिकांनी गर्दी केली. दीपोत्सवानंतर आकाश उडणाऱ्या फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली. तसेच नागरिकांनी येताना आणलेले प्लॅस्टिक पिशवी, कागद त्याचठिकाणी पडल्यामुळे बागेत कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे बाग अस्वच्छ दिसत होती.

संबंधित कार्यक्रमांच्या आयोजकांनी सारसबागेत फटाके फोडले. तसेच बागेत कचराही झाला. त्यामुळे आयोजकांचे डिपॉझिट जप्त करण्यात येणार असून पुढच्यावेळी त्यांना परवानगी द्यायची की नाही, याबाबत विचार करण्यात येईल.
– अशोक घोरपडे, उद्यान अधिकारी, मनपा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)