खारेकर्जुने येथील शौचालयांच्या कामात गैरव्यवहार

 चौकशीच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर मनसेचे निदर्शने

नगर: नगर तालुक्‍यातील खारेकर्जुने येथे सन 2016 ते 2018 दरम्यान ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत शौचालयाच्या कामासाठी देण्यात आलेल्या अनुदानात गैरव्यवहार झाला असून त्याची चौकशी करावी, या मागणीसाठी नगर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करण्यात आली.

यावेळी मनसेचे नगर तालुकाप्रमुख बाळासाहेब ढवळे, जगन्नाथ बर्डे, हेमंत विनायक, सचिन निमसे, बाळासाहेब बर्डे, मच्छिंद्र निमसे आदि उपस्थित होते. खारे कर्जुने येथे ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत सन 2016 ते 2018 दरम्यान गावात एकूण 181 शौचालयासाठी अनुदान वाटप करण्यात आले. हे शौचालय ग्रामस्थांना बांधून देण्यात आले. या शौचालयासाठी जिल्हा परिषदेकडून 12 हजार रुपये तसेच एमआयडीसी येथील सनफार्मा कंपनीच्या पीसीआर फंडातून 7 हजार असे लाभार्थींना प्रत्येकी 19 हजार रुपये देण्यात आले. परंतु प्रत्यक्षात 12 हजार रुपये अनुदान दाखवून अत्यंत निकृष्ट दर्जाचे शौचालये बांधण्यात आले आहे.

हे शौचालय फक्त 9 हजार रुपये पर्यंतच बांधण्यात आले असून, यामध्ये लाभार्थींनी देखील बराचसा खर्च केला आहे. या 181 शौचालयाच्या कामात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला असून, या प्रकरणाच्या चौकशीसाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती नेमून याचा चौकशी अहवाल सादर करावा. तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मनसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत सर्व पुरावे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडे सादर करुन त्यांना देखील या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे ढवळे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)