पुणे – वर्गीकरण केले असेल, तरच कचरा घेणार

पालिकेचा पवित्रा : वेचकांनाही स्पष्ट सूचना

पुणे – उरुळी देवाची येथील कचरा डेपो बंद ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन पुकारले होते. त्यामुळे आता सुरु असलेले प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी शहरातून केवळ वर्गीकरण केलेला कचरा घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्याबाबतच्या सूचना कचरा वेचकांना दिल्या असून ज्या सोसायट्या तसेच नागरिक कचरा वर्गीकरण करून देणार नाहीत, त्यांचा कचरा स्वीकारू नये, असे आदेश देण्यात आले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप म्हणाले, लाखो रुपये खर्चून ओल्या आणि सुक्‍या कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारलेले आहेत. मात्र, नागरिक आणि सोसायट्यांना वर्गीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही शहरात निर्माण होणाऱ्या 1,600 टन पैकी केवळ 700 ते 750 टन वर्गीकरण केलेला कचरा जमा होतो. त्यामुळे अनेक प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत नाहीत, तसेच ओला आणि सुका कचरा मिश्र आल्याने त्यावर योग्य प्रक्रिया शक्‍य होत नाही. परिणामी, हा कचरा उरूळी देवाची येथील डम्पिंग करावा लागत आहेत. त्यामुळे महापालिकेने ही बाब गांभीर्याने घेण्याचा निर्णय घेतला आहे. या पुढे नागरिक तसेच सोसायटयांचा कचरा वर्गीकरण केलेला नसल्यास तो स्वीकारला जाणार नसल्याचे जगताप म्हणाले.

तातडीची नियमावली, सोसायट्यांना दंड
कचरा समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रशासन तातडीची नियमावली तयार करत आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर म्हणाले. त्यात प्रामुख्याने कचरा वर्गीकरणावर भर देण्यात येणार असून तसे न झाल्यास सोसायट्यांना दंड आकरण्यात येणार आहे, त्याबाबतचा प्रस्ताव येत्या मुख्यसभेत ठेवण्याबाबत येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)