पिंपरी – घरांवर दगडफेक करत कोयत्याचा धाक दाखवून सहा जणांच्या टोळक्यांनी नागरिकांना जिवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवार (दि.16) सायंकाळी पिंपरीतील विठ्ठलनगर येथील जगदीश सुपर मार्केटजवळील मटण गल्लीत घडली.
या प्रकरणी एका 55 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शुभम बोराडे (वय 25), दिनेश (वय 26), सुरज घोडके (वय 24), उमेश सटवा सरवदे (वय 26), गणेश सटवा सरवदे (वय 30) आणि महेश सटवा सरवदे (वय 22, सर्व रा. मटण गल्ली, विठ्ठलनगर, पिंपरी) या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश सरवदे याला अटक केली आहे. तर इतर आरोपी अद्याप फरार आहेत.