ऑनलाईन ड्रग्जची विक्री करणारी टोळी गजाआड

मुंबईतून 14 नायजेरियन अटकेत

मुंबई: काही दिवसांपासून ख्रिसमस आणि नव वर्षानिमित्त सर्वत्र जोरदार पार्ट्यांची तयारी सुरु आहे. त्यासोबतच ड्रग्जची तस्करी करणारेही फोफावू लागले आहेत. याबाबत माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये 14 नायजेरियन तस्करांना गजाआड केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरवर्षी नववर्षाच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या पार्ट्यांमुळे मुंबईत ड्रग्जची मागणी वाढते. ही मागणी पूर्ण करण्यासाठी व ड्रग्जचा व्यापार वाढवण्यासाठी अनेक ड्रग्ज तस्कर मुंबईसह आसपासच्या परिसरात येतात. या तस्करांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी मुंबई पोलिसही सज्ज झाले आहेत.

पोलिसांनी 15 डिसेंबरपासून कॉम्बिंग ऑपरेशन सुरु केले आहे. त्यामध्ये 7 नायजेरियन नागरिकांना एमडी, ब्राऊन शुगर, कोकेनसह अटक केली आहे. त्यापैकी 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यातून निसटले. पोलीस उपायुक्त अविनाश कुमार म्हणाले, सोमवारी 2 नायजेरियन भायखळ्यात दिसले. आमच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर लक्ष ठेवले. त्यांचा पाठलाग केल्यानंतर त्यांचे अजून काही साथीदार पकडले. गेल्या 12 दिवसांपासून मुंबई पोलिसांनी सुरु केलेल्या कॉम्बिंग ऑपरेशनद्वारे आतापर्यंत 14 ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात आली आहे

पकडलेल्या 14 नायजेरियन्सकडून पोलिसांनी 21 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. तसेच एक पिस्तूल आणि काही काडतूसेही मिळाली आहेत. पोलिसांच्या हाती लागलेल्या माहितीनुसार हे तस्कर ऑनलाईन आणि सोशल मीडियाद्वारे ड्रग्जची विक्री करत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)