दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

पाच आरोपींसह दरोड्याचे साहित्य पोलिसांकडून जप्त
स्थानिक गुन्हे शाखेची करंजी घाटात मोठी कारवाई
नगर – पाथर्डी रस्त्यावर करंजी घाटातील हजरत माणिकशहा पिरबाबा दर्गा परिसरात दरोडा टाकन्याच्या तयारीत असलेल्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. नागंऱ्या रुस्तम चव्हाण, (वय- 39, रा. टाकळी फाटा, ता- पाथर्डी, एकनाथ पिंपळ्या भोसले,(वय-39, रा. पिंपरखेडा, ता- गंगापूर, जि. औरंगाबाद), धरम दुशिंग भोसले,(वय.24, रा. टाकळी फाटा, ता.पाथर्डी) समाधान काजम काळे (वय.26, रा. हात्राळ, ता.पाथर्डी), अमोल काजम काळे, वय-32, रा. हात्राळ, ता. पाथर्डी) याआरोपींसह एक लोखंडी कटावणी, एक लोखंडी गज, दोन लाकडी दांडके व मिरची पुडसह स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.

पोलीस अधीक्षक इशु सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गुप्त बादमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानेश फडतरे, सचिन खामगळ, सुनिल चव्हाण, मोहन गाजरे, सोन्याबापू नानेकर, भाऊसाहेब काळे, बबन मखरे, संदीप घोडके, मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, रविंद्र कर्डीले, संदीप पवार, विशाल दळवी, सुरेश माळी, रोहीदास नवगीरे, आण्णा पवार, दीनेश मोरे, सागर सुलाने, योगेश सातपूते, विनोद मासाळकर, विजय धनेधर, ज्ञानेश्‍वर शिंदे, राहुल सोळंके, संदीप चव्हाण, बबन बेरड, सचिन कोळेकर, भरत बुधवंत यांच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली. स्थानिक गन्हे शाखेचे रोहीदास शंकर नवगीरे,(वय-32, रा.नगर) यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)