चाकरमान्यांनो, करा तयारी; गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वे

आरक्षण सुविधा गुरूवारपासून झाली सुरू

पुणे – कोकणातून काम-नोकरी किंवा व्यवसायासाठी पुण्यात आलेल्यांची संख्या मोठी आहे. गणेशोत्सवाच्या काळात ही मंडळी आवर्जून गावी जातात. अशा भाविकांसाठी मध्य रेल्वेने विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

गणेशोत्सवानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता पुण्याहून कोकणाकडे विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. पुण्याहून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप येथे ही विशेष रेल्वे धावणार आहेत. यासाठी गुरूवारपासून आरक्षणाला सुरूवात झाली आहे. रेल्वेला एक वातानुकूलित 2-टियर, तीन वातानुकूलित थ्री-टियर, 6 स्लीपर कोच, 6 जनरल सेकंड क्‍लास कोच जोडले जाणार आहेत.

दरम्यान, मध्य रेल्वेने यापूर्वी जाहीर केलेल्या पुणे-सावंतवाडी रोड, पनवेल-सावंतवाडी रोड, पनवेल-रत्नागिरी या रेल्वेंना वातानुकूलित तृतीय श्रेणी व एक सामान्य द्वितीय श्रेणी डबे जोडणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

असे आहे वेळापत्रक
01421 विशेष रेल्वे पुण्याहून 10 सप्टेंबर रोजी रात्री 11.30 वाजता सुटून झाराप येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 2.45 वाजता पोहोचेल. तर, परतीच्या प्रवासात 01422 विशेष रेल्वे झाराप येथून दिनांक 11 सप्टेंबर रोजी 3.30 वाजता सुटणार असून ती पुण्यात दुसऱ्या दिवशी पहाटे 6.00 वाजता पोहचेल.

या स्थानकांवर असतील थांबे
पुणे स्टेशन, चिंचवड, लोणावळा पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्‍वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ याठिकाणी थांबा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)