#Ganeshotsav2018 : सेल्फी विथ बाप्पा…तुमच्या बाप्पाचे फोटो whatsapp करा

पुणे : आपल्या लाडक्या बाप्पांचे आगमन अगदी काही तासावर आलं आहे. घरोघरी बाप्पांच्या स्वागताची तयारी सुरु आहे. घरातली मोठी मंडळी बाप्पांची मूर्ती तयार आहे की नाही हे मूर्तीवाल्याकडून कन्फर्म करून घेताहेत. तर बच्चेकंपनी बाप्पाच्या स्वागतासाठी काय काय तयारी करायची यामध्ये मग्न आहेत. या सगळ्यात उद्याचा दिवस कधी येईल कळणार सुद्धा नाही.

बाप्पांचे घरी आगमन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना बाप्पांचे फोटो व्हाॅट्सअप वरून नक्कीच शेअर करणार. तेच फोटो दैनिक प्रभातलाही पाठवा… आमची वेबसाईट www.dainikprabhat.com वर आम्ही तुमच्या घरच्या बाप्पाचे फोटो पब्लिश करू. फोटो पाठवताना बाप्पांसाठी केलेल्या सजावटीसह फोटो पाठवा. शिवाय तुमच्या संपुर्ण फॅमिलीचा बाप्पासोबत एक सेल्फी काढून तोही आम्हाला पाठवा. फोटो पाठवताना तुमचे संपूर्ण नाव, तुम्ही राहता त्या शहराचे नाव त्यामध्ये नमूद करायला विसरू नका.

फोटो whats app वर पाठवू शकता. त्यासाठी आमचा whats app क्रमांक 8308835022

आमच्या  prabhatonlinenews@gmail.com  या मेल आय डी वर
किंवा मग
आमच्या फेसबुक पेज वर मेसेज मधूनसुध्दा तुम्ही आम्हाला फोटो पाठवू शकता.

फेसबुक पेज लिंक : https://www.facebook.com/edainikprabhat/

तर मग यंदाचा गणेशोत्सव दैनिक प्रभातसोबत दणक्यात, धुमधडाक्यात साजरा करूयात…

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया !!!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
150 :thumbsup:
87 :heart:
1 :joy:
27 :heart_eyes:
22 :blush:
1 :cry:
2 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)