अवघा देश आपल्या लाडक्या गणपती बाप्पांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने हिला देखील बाप्पांच्या आगमनाची चाहूल लागली असून माधुरीने ‘इन्स्ट्राग्राम’वर एक फोटो शेअर करून गणेशोस्तवासाठी तिने केलेल्या तयारीची एक झलक प्रेक्षकांना दाखवली आहे.

या फोटोबरोबरच तिने ‘गणेशोस्तवा’बाबतच्या आपल्या भावनांना देखील वाट मोकळी करून देताना “गणेशोस्तव म्हणजे संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन उत्साहात साजरी करायचा सण, गणेशोस्तवात आम्ही गाणी, नृत्य आणि मोदक यांचा आस्वाद घेतो. गणेशोस्तव माझा सर्वात आवडीचा सण आहे.” असे म्हंटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)