नियमांचे पालन न करणाऱ्या मंडळांवर कडक कारवाई – गोर्डे

गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याची नेवासा पोलीस स्टेशनला बैठक

नेवासाफाटा  – गणेशोत्सव शांततेत व उत्साहाच्या वातावरणात साजरा करताना नियमाचे पालन करा, अन्यथा बेशिस्त वागणाऱ्या मंडळावर कारवाई करणार असल्याचे प्रतिपादन पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांनी केले. गणेशोत्सवात डीजे लावणाऱ्या मंडळावर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या आदेशाने घेण्यात आलेल्या गणेश मंडळातील कार्यकर्त्यांच्या बोलावलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे म्हणाले की गणेशोत्सव काळात कार्यकर्त्यांनी एकमेकांशी वाद घालणे टाळावे हीच अपेक्षा आपल्याकडून राहील. रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही यासाठी रस्त्यावर मंडप उभे करू नका.

मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यास चांगले राहील. गणेश मंडळाच्या मागील बाजूस जुगार खेळताना आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा ईशारा त्यांनी दिला. जेथे गणेशाची स्थापना मंडळ करणार आहे त्या खाजगी जागेच्या मालकाचे संमतीपत्र इतर ठिकाणी असल्यास नगरपंचायतची परवानगी घ्यावी अशा सूचना त्यांनी केल्या.

दहा दिवसांच्या गणेशोत्सव काळात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या सदस्यांची नावे मोबाईल नंबर असा चार्ट तयार करावा. मिरवणुकीत विद्युत वाहिनीला अडथळा होणार नाही असाच सेट वाहनांच्या गाडीवर असावा. प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यावर लक्ष ठेवणे ही देखील जबाबदारी त्या मंडळाच्या अध्यक्षावर राहील.

मंडळाच्या कार्यकर्त्यांना नियमांचे पालन करतांना स्वैराचाराने वागू नये. प्रत्येक मंडळाच्या गणेश मूर्तीच्या रक्षणासाठी स्वयंसेवक असावा, गणपतीच्या निघणाऱ्या मिरवणुकीत लेझीम झांज पथक सादर करणाऱ्या मंडळाला सादरीकरण करण्यासाठी मोहिनीराज मंदिर चौकात अर्धा तास दिला जाईल असा ही निर्णय घेण्यात आला.

यावेळी कॉंग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष संजय सुखधान, भाऊसाहेब गंधारे, सुधीर चव्हाण, सुहास पठाडे,अभिषेक गाडेकर, वैभव दुधे, सागर पडूंरे, श्रावण रेनिवाल, सोमेश मापारी, मंगेश दुधे, स्वप्नील कडपे, आण्णा जाधव, अभिषेक सुपेकर यांच्या सह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)