21 व्या शतकातही गांधीजींचे विचार लागू : राष्ट्रपती

राष्ट्रपतींच्या हस्ते गांधी शांतता पुरस्काराचे वितरण

विवेकानंद केंद्र, अक्षय पात्र फौंडेशन, सुलभ इंटरनॅशनल आणि एकल अभियान ट्रस्टला पुरस्कार

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नवी दिल्ली – गांधी विचार, गांधीवादी संघर्षपद्धती, गांधीवादी विचारांनी मानवीय स्वातंत्र्य प्राप्त करण्याविषयी आमच्या काळातील महान नेत्यांना प्रभावित केले आहे. अमेरिकेचे मार्टीन ल्यूथर किंग, ज्यूनिअर ते दक्षिण आफ्रिकेचे नेल्सन मंडेला आणि पोलंडचे लेक वेलेसा यांसारख्या राजकीय नेत्यांना गांधी विचारांनी प्रभावित केले आहे. समकालीन इतिहास समजण्यासाठी तसेच शोषण आणि असमतेविरोधातील लढ्यासाठी गांधीविचार अनमोल आहेत, अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महात्मा गांधींच्या विचारांची महती विशद केली. राष्ट्रपतींच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात झालेल्या सोहळ्यात 2015, 2016, 2017 आणि 2018 चे गांधी शांतता पुरस्कार पंतप्रधानांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

2015 चा गांधी शांतता पुरस्कार विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी, 2016 चा गांधी शांतता पुरस्कार संयुक्तरित्या अक्षय पात्र फाऊंडेशन आणि सुलभ इंटरनॅशनल, 2017 चा एकल अभियान ट्रस्ट आणि 2018 चा श्री योहेई ससाकावा यांना प्रदान करण्यात आला.

राष्ट्रपती म्हणाले की, 21 व्या शतकातही गांधीजींचे विचार लागू होतात. गांधीजी दीर्घकालीन गरजांवर भर देत होते, पर्यावरणाप्रती संवेदनशील होते तसेच निसर्गनियमानूसार जीवन व्यतीत करत होते. त्यांना सध्याच्या काही आव्हानांचा अंदाज होता. संयुक्त राष्ट्रसंघाकडून निर्धारीत करण्यात आलेली शाश्वत विकासाची ध्येयं गांधी विचारांवर आधारीत आहेत. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीत भारताची भूमिका तसेच स्वच्छ भारत मोहीम यामध्ये गांधीविचाराचे प्रतिबिंब आहे.

पुरस्कारविजेत्यांसंदर्भात बोलताना राष्ट्रपती म्हणाले की, विवेकानंद केंद्राने देशभर फिरुन विशेषतः आदिवासी समुदायांमध्ये जाऊन स्वयंसहायता, शाश्वतता आणि विकासाला प्रोत्साहन दिले आहे. संस्थेने शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात क्षमतानिर्माण केली आहे. अक्षयपात्र फाऊंडेशनने शिक्षणाच्या प्रसाराबरोबरच भूक मिटवण्याचे आणि योग्य पोषण देण्याचे कार्य केले आहे. फाऊंडेशन शालेय विद्यार्थ्यांना संतुलित आणि पोषणाहार देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे.

सुलभ इंटरनॅशनल आणि तिचे संस्थापक डॉ बिंदेश्वर पाठक यांनी स्वच्छतेप्रती चांगली कामगिरी केली आहे. ज्याकाळात कोणी समोर येत नव्हते त्याकाळात त्यांनी हे काम केले आहे. एकल अभियान ट्रस्ट 22 लाख मुलांना त्यापैकी 52 टक्के मुलींना शिक्षणाप्रती सहकार्य करत आहे. ट्रस्टच्या कामाचा लाभ आदिवासी समुदायातील मुला-मुलींना झाला आहे. श्री योहेई ससाकावा यांनी कुष्ठरोग निर्मूलनाविरोधात लढ्यात महत्वाची भूमिका निभावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)