गांधीजींची विचारधारा ही भाजपाचीच होती : गिरीश महाजन 

मुंबई: कॉंग्रेस पक्षाने गांधीजींच्या नावाचा फक्त राजकीय लाभासाठी वापर केला आहे. गांधीजी कधीच कॉग्रेसचे नव्हते आणि महत्वाचे म्हणजे गांधीजींची विचारधारा ही भाजपाचीच होती, असे वक्तव्य राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. महाजन यांच्या या वक्तव्यमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. कॉंग्रेस नेते याला काय प्रतिउत्तर देतात याकडे लक्ष लागले आहे.
भाजपाने गांधीजींच्या 150व्या जयंतीनिमित्त “जयंती ते पुण्यतिथी’ असा कार्यक्रम आखला असून जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी गांधी पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रे संदर्भात बोलताना जलसंपदामंत्र्यांनी गांधीजींविषयी भाजपची भूमिका विशद केली.
महात्मा आपलेच असल्याने त्यांचे विचार लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी गांधीजींच्या मार्गावर चालावे, असे आवाहान महाजन यांनी केले. गिरीश महाजन म्हणाले, “राम’ नामाचा जप करा आणि गांधी मार्गावर चलायला शिका! गांधीजींच्या विचारांनुसार कॉग्रेस नव्हे, तर भाजपा चालत आहे. त्यांच्या विचारांचे अनुकरण भाजपा करत आहे. महात्मा गांधी हे भाजपाच्याच विचारांचे होते, असा दावा जलसंपदामंत्री महाजन यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)