“गांधी हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है’ 

राज्यपालांविरोधात घोषणाबाजी ः विरोधकांचा अभिभाषणावर बहिष्कार

मुंबई – विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपालांना विरोधकांचा सामना करावा लागला. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे विधिमंडळाच्या आवारात आगमन होताच विरोधकांनी “गांधी हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है’, आरएसएसचे समर्थन करणाऱ्या राज्यपालांचा धिक्कार असो… अशा घोषणा देत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि आघाडीतील पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.

राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारकडून गेल्या साडेचार वर्षांत जनतेची नुसती फसवणूक होत असल्याचा आरोप करत विरोधकांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या निमीत्ताने सरकारने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत सरकारविरोधात आक्रमक होण्याचा इशारा दिला होता. राज्यपाल अभिभाषणावर बहिष्कार टाकत विरोधकांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकार विरोधातील भूमिका दाखवून दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यपाल हे पद घटनात्मक असताना त्यांनी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. आजचे त्यांचे अभिभाषण हे राज्यपाल म्हणून राज्याच्या हिताचे असेल की संघाचा कार्यकर्ता म्हणून संघाचा अजेंडा राबवणारे? याबाबत शंका असल्याने आम्ही अभिभाषणावर बहिष्कार घालत आहोत, असे धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सहा दिवस चालणाऱ्या अधिवेशनात दुष्काळ, शेतकरी कर्जमाफी, धनगर, मुस्लिम आरक्षण, नोकरभरती, मुंबई विकास आराखडा आणि मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप या मुद्दावरून विरोधी पक्षांकडून सरकारची कोंडी केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)