गांधी कुटुंबाच्या प्राप्तीकर तपासणीचा निकाल हा चहावाल्याचा विजय : मोदी

पाली (राजस्थान): “युपीए’ अध्यक्षा सोनिया गांधी आणि कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्राप्तीकर विवरणांची फेरतपासणी करण्याबाब्त सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल म्हणजे आपल्या सरकारचा मोठा विजयच आहे. चहावाल्याने दाखवलेल्या धाडसामुळेच हे शक्‍य झाले, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर टीका केली. ते राजस्थानात पाली जिल्ह्यातील सुमेरपूर येथील प्रचारसभेमध्ये बोलत होते.

गांधी कुटुंबीय चार पिढ्यांपासून विशेषाधिकार उपभोगत होते. मात्र आता त्यांची (गांधी कुटुंबीय) सुटका कशी होते, तेच पहातो. चार दशकांपासून देशावर राज्य करणाऱ्यांना कोर्टाच्या दारात चहावाल्याने आणले आहे, असे मोदी म्हणाले. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या 2011-12 सालच्या प्राप्तीकर विवरणांची फेरतपासणी करण्याची परवानगी दिली आहे, त्यासंदर्भाने मोदी बोलत होते.

राजस्थानातील विधानसभेच्या निवडणूकीसाठी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मोदींनी ऑगस्टा वेस्टलॅन्ड हेलिकॉप्टर खरेदीतील दलाल ख्रिश्‍चियन मिशेलच्या प्रत्यार्पणाचाही उल्लेख केला. सरकारने हेलिकॉप्टरघोटाळ्यातील मध्यस्थाला दुबईमधून भारतात आणले. त्याने कोणकोणत्या राजकीय नेत्यांना लाच दिली, याचे रहस्य आता उघड होईल, असे मोदी म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)