गांधी कुटुंबाचे मिशेल सोबत घनिष्ठ संबंध : अमित शहा

नवी दिल्ली : “ऑगस्ता वेस्टलॅंड घोटाळ्यातील मध्यस्ती ख्रिश्चन मिशेल याचे काँग्रेस पक्षातील जेष्ठ नेत्यांशी घनिष्ठ संबंध आहेत.” असा आरोप करत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज गांधी कुटुंबियांवर निशाणा साधला.

ऑगस्ता वेस्टलॅंड घोटाळ्याबाबत ट्विटरद्वारे अमित शहा यांनी काँग्रेसनेतृत्वावर घणाघाती टीका करताना, त्यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“सोनिया गांधी यांच्याबाबत विचारल्या गेलेल्या प्रश्नांबाबतची माहिती ख्रिश्चन मिशेलने आपल्या वकिलांकडे का सोपवली? त्याला ती माहिती सोनिया गांधींपर्यंत पोहोचवायची होती का?” असे ट्विट त्यांनी केले आहे.

आपल्या ट्विटद्वारे त्यांनी, “आपणा सर्वांनाच झेंडू बाम आणि टायगर बाम विषयी माहिती आहे पण गैरव्यवहारात सामील असणाऱ्या सर्वच मध्यस्तींना हा ‘फॅमिली बाम’ का हवा आहे?” असा प्रश्न देखील उपस्थित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)