गळनिंब पाणी योजना ठरली राजकीय बळी

राजकारणामुळे योजनेला अखेरची घरघर : भाग- 3


-सचिन दसपुते

गोपाळपूर – नेवासे तालुक्‍यातील जायकवाडी बॅकवॉटर परिसरातील गावासाठी वरदान असलेली गळनिंब-शिरसगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना नेवासे तालुक्‍यातील राजकारणाची बळी ठरल्याचे चित्र गेल्या दोन वर्षापासून दिसून येत आहे. तालुक्‍यातील चिखल फेकीच्या राजकारणामुळे गळनिंब, सलबतपूर, शिरसगाव, गोपाळपूरसह 20 गावांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येत आहे. चालू वर्षी पाऊस कमी पडल्याने उन्हाळ्यामध्ये या गावांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना पाणी योजना सुरळीत चालवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यानंतर ही योजना कधी सुरू तर, बहुतेक वेळा बंदच राहिली. विठ्ठलराव लंघे अध्यक्ष पदावरून पायउतार झाल्यानंतर, त्यांनी पण योजनेकडे दुर्लक्ष झाले आणि योजनेला घरघर लागली. मागील वर्षी थकीत बिलामुळे योजना बंद राहिल्यानंतर जिल्हा परिषदेच्या निधीमधून काही पैशाची तरतूद करण्यात आली.

बिल भरून योजना सुरू झाली. यामध्ये पंचायत समितीच्या सभापती व तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये श्रेय वादाची लढाई रंगली. नंतर काही दिवस योजना सुरळीत चालल्यानंतर पुन्हा लिंकेज, मोटार बिघाड व थकीत बिलापोटी योजना बंद पडली, ती आज वर्षे झाले तशी बंदच आहे. याकडे लोकप्रतिनिधी लक्ष देईनात, ना पंचायत समितीच्या सभापती.
कोट्यवधी रूपये खर्च करून उभा केलेली योजना, आज किरकोळ काम, वीजबिल या कारणांमुळे बंद आहे.

यासाठी लोकप्रतिनिधी, पंचायत समिती सभापती, सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व गावागावातील पदाधिकारी यांनी पुढाकार घेऊन, निधीसाठी पाठपुरावा करून योजना सुरू करून, सुरळीत चालवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, परंतु तसे न करता फक्त आरोप-प्रत्यारोप करून राजकारण करायचे व जनतेला झुलवत ठेवायचे, असाच काहीसा प्रकार या योजनेबाबत होत असल्याने ही योजना तालुक्‍याच्या राजकारणाचा बळी ठरली आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

या कारणांमुळे योजना बंद

गळनिंब-शिरसगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ही तीस वर्षापूर्वी ची योजना असल्याने, योजनेचे असलेले पाईप निकृष्ठ झाले आहेत. त्यांना गळती लागल्याने योजना बंद पडते. योजना चालवण्यासाठी वापरण्यात आलेल्या मोटारी या बहुतेक वेळा बिघाड होऊन बंद पडतात, यामुळे योजना बंद राहते. पाणी पट्टी वसूल होत नाही, यामुळे वीज पुरवठा खंडीत केला जातो, याकडे कोणी पदाधिकारी लक्ष देत नसल्याने वीज भरण्यासाठी पैसा उपलब्ध होत नाही. यावरून राजकारण केले जाते. श्रेय घेण्यासाठी राजकारणी प्रयत्न करतात, या वादामुळे योजना बंद राहते. यामुळे नागरिक हैराण आहेत.

गळनिंब-शिरसगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना वर्षांपासून बंद


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)