गाजाने तामिळनाडूला झोडपले 

23 ठार, 81,000चे स्थलांतर 

चेन्नई – तामिळनाडूसह ओडीशाला आज गाजा चक्रिवादळाने जोरदार तडाखा दिला. यात आतापर्यत 23 जणांचा मृत्यू झाला असून 81,948 नागरिकांचे सुरक्षितपणे स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच युद्धपातळीवर मदतकार्य सुरू असल्याचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी सांगितले.

आज सकाळी नागपट्टीनम आणि वेदार मन्नियम यांच्यादरम्यान ताशी 120 किमी वेगाने वाहणाऱ्या तुफानासह चक्रीवादळ गाजा धडकले. चक्रीवादळाने तामीलनाडूच्या किनारी भागातील कुड्डलोर, नागपट्टीनम, थोंडी आणि पंबन या गावांना, तर पुड्डिचेरीतील कराईक्कल या शहराचे मोठे नुकसान झालेले आहे. आज नागपट्टीनममधील सर्व शिक्षणसंस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या. नागपट्टीनम, कुड्डलोर, कराईक्कल, तिरुवारूर, तंजावर, पुडुकोट्टाई आणि रामनाथपुरम या जिल्ह्यांमध्ये 200 सेंमीपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे.

चक्रीवादळाचा तडाखा बसणाऱ्या जिल्ह्यामध्ये तमिळनाडू सरकारने हाय अलर्ट जारी केला आहे. दोन एक तासांत या चक्रीवादळात अनेक झाडे जमीनदोस्त झाले आहेत. तर तुफान पावसामुळे किनाऱ्याजवळच्या भागात काहीशी पडझड झाली आहे.

दरम्यान, नौदलाची हेलिकॉप्टर्सही या मदत कार्यात सहभागी झाले आहेत. या कामात किनारपट्टी भागत दोन नौदलाची दोन जहाजे आयएनएस रणवीर आणि खंजर बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आली आहेत. तसेच मुख्यमंत्री पलानी स्वामी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री निधीमधून 10 लाखांची मदत जाहीर केली आहे.

गाजा चक्रीवादळाने सुमारे 500 किमी लांबीच्या विद्युतवाहिन्या प्रभावित झाल्याने वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. हा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी किमान दोन दिवस लागणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. गाजा चक्रीवादळाने ओडिशालाही तडाखा दिलेला आहे. ओडिशातील सुमारे 80,000 लोकांना 470 निवारा केंद्रांमध्ये हलविण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)