अमेरिकन वस्तूंवरील आयात शुल्कवाढ रहीत

उभय देशांतील व्यापार चर्चा संपल्यावर पुढील निर्णय होण्याची शक्‍यता

-भारतीय शिष्टमंडळ चर्चेसाठी एप्रिलमध्ये अमेरिकेला जाणार

-आयात शुल्कवाढ सहाव्या वेळी पुढे ढकलली

नवी दिल्ली – भारतावरील काही वस्तूंवर अधिक आयात शुल्क लावण्याची घोषणा केल्यानंतर भारतानेही अमेरिकेतून भारतात येणाऱ्या 29 वस्तूंवर वाढीव आयात शुल्क लावण्याची घोषणा केली होती. मात्र या निर्णयाच्या अंमलबजावणीची मुदत वाढ 2 मे पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्या अगोदर वाढीव आयात शुल्क 1 एप्रिलपासून लागू होणे अपेक्षित होते. याअगोदरही 6 वेळा या निर्णयाच्या अंमलबजावणीची मुदत वाढ देण्यात आलेली आहे. या काळात दोन्ही देशांदरम्यान व्यापार संतुलित करण्याबाबत चर्चा चालू आहे. ही चर्चा अजून पूर्ण व्हायची आहे. त्यामुळे या निर्णयाच्या अंमलबजावणीची वेळोवेळी मुदत वाढ देण्यात येत येत असल्याचे वाणिज्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यानच्या काळात अमेरिकेने भारतीय आयातीला दिल्या जात असलेल्या काही सवलती रद्द करण्याची घोषणा केली होती. याअंतर्गत अमेरिका भारतातील 5.6 अब्ज डॉलरच्या 1900 वस्तू आयात करीत होती. यामुळे भारतीय निर्यात दारात खळबळ उडालेली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी वाणिज्य विभागाचे एक शिष्टमंडळ पुढील महिन्यात अमेरिकेला जाण्याची शक्‍यता आहे.

त्याचबरोबर अमेरिकेचे शिष्टमंडळही यासंदर्भात चर्चा करण्यासाठी भारतात येऊन गेलेले आहे. अमेरिकेच्या प्रशासनाने अमेरिकेबरोबर भारतासह काही देश असंतुलित व्यापार करीत असल्याचा आरोप केला असून त्यांच्या विरोधात मोहीम सुरू करण्याची धमकी दिली आहे, त्यात भारताबरोबरच चीन आणि युरापीयन संघाचा समावेश आहे.

यातील अनेक देशांबरोबर अमेरिका चर्चा करीत आहे. त्याचबरोबर अमेरिकन सरकारने भारत आणि इतर देशांतून अमेरिकेत कामासंबंधीच्या व्हिस्यावर जाणाऱ्या कर्मचाऱ्याच्या नियमात कठोरता आणली आहे. त्यामुळे भारतातून अमेरिकेत सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करण्यासाठी जाणाऱ्या हजारो तरुणांवर परिणाम झालेला आहे. याबाबतही अमेरिका आणि भारताचे अधिकारी चर्चा करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)