हरियाणा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणा येथे आयोजित करण्यात आलेल्या एका प्रचार सभेमध्ये बोलताना विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी एका प्रचार सभेमध्ये बोलताना दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना “भ्रष्टाचारी नंबर १” म्हणून संबोधलं होत. पंतप्रधानांच्या या वक्तव्यानंतर देशभरातील काँग्रेस नेत्यांनी त्यांना चांगलंच धारेवर धरत त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला होता.
दरम्यान, याच पार्श्ववभूमीवर आज पंतप्रधानांनी हरियाणा येथे बोलताना काँग्रेसच्या नेत्यांकडून त्यांच्याबाबत वापरलेल्या आक्षेपार्ह्य शब्दांचा पाढाच वाचून दाखवला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, “माझ्या बाबत अपशब्दांचा वापर करून विरोधकांनी कित्येक वेळा मर्यादा ओलांडली हे यांच्या प्रेमाच्या डिक्शनरीतून स्पष्ट होतंय. यांनी मला स्टुपिड पीएम म्हणून हिणवलं, सैनिकांच्या रक्ताचा दलाल म्हणून संबोधलं, यांच्या प्रेमाच्या डिक्शनरीमधून माझ्यासाठी गद्दाफी, मुसोलिनी, आणि हिटलर असे शब्द निघाले.”
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांच्यावर केलेल्या आरोपांना उत्तर देताना राहुल गांधी यांनी ट्विटरद्वारे ‘मोदींसाठी प्रेम आणि आलिंगन’ असा शब्दप्रयोग केला होता. राहुल गांधींनी यापूर्वी देखील मोदी द्वेषाचे राजकारण करतात आपण त्यांना प्रेमाचे राजकारण करून उत्तर देऊ असं म्हंटलं होतं. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील जाहीर सभेद्वारे काँग्रेस नेत्यांनी त्यांच्याबाबत वापरलेल्या आक्षेपार्ह्य शब्दांचा पाढा वाचत राहुल गांधींच्या ‘प्रेमाच्या राजकारणावर’ प्रश्न उपस्थित केला आहे.
PM in Haryana: Mujhe gali dete hue in logon ne kitni baar maryada taar-taar ki hai, inki prem wali dictionary se pata chalta hai. Mujhe stupid PM kaha gaya, jawanon ke khoon ka dalal kaha gaya. Inke prem ki dictionary se mere liye Gaddafi, Mussolini aur Hitler jaise shabd nikle pic.twitter.com/maWjtN4GTh
— ANI (@ANI) May 8, 2019