सरकारची अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा : रोहित पवार

नगर – शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या शुभांगी संजय जाधव, निकिता धनंजय जाधव व पूनम राजेंद्र जाधव यांची जिल्हा रुग्णालयात राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी भेट घेऊन चर्चा केली. पवार यांच्याशी चर्चा करताना मुलांनी हे आंदोलन तात्पुरते मागे घेतले असून, मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले. पवार म्हणाले, “सत्ताधारी फसवेगिरी करीत आहे.

आंदोलन दडपण्यासाठी तीनशे पोलिसांनी बळाचा वापर केला ही निषेधार्ह बाब आहे. शिक्षण घेण्याच्या वयात युवक-युवती आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेत असतील तर ते भविष्याच्या दृष्टिने घातक आहे.’ सत्ताधाऱ्यांच्या दडपशाहीने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असताना सर्वसामान्य जनता पेटून उठणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तर शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी या आंदोलनास पाठबळ असणार असल्याचे स्पष्ट केले.

राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष अभिजीत खोसे, जिल्हाध्यक्ष कपिल पवार, कार्याध्यक्ष संजय कोळगे, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवलकर, सागर गुंजाळ, ऋषीकेश ताठे, वैभव ढाकणे, राहुल ठोंबरे, संजय दिवटे, ऋषीकेश ताठे, रोहण शिरसाठ, विशाल मांढे, रुपेश चोपडा, योगेश फुंदे आदी उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)