जी-20 शिखर परिषद-2022 होणार भारतात : मोदीनीतीचे यश

नवी दिल्ली: जी20 शिखर परिषद 2022 चे आयोजन भारत करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्जेंटिनाची राजधानी ब्यूनोस एयर्स येथे शनिवारी हे जाहीर केले. भारताला जी-20 शिखर परिषदेचे यजमानपद मिळणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कूटनीतीचे यश मानले जात आहे. जी20 शिखर परिषद 2022चे आयोजन इटली करणर होती, ती संधी इटलीने भारताला दिल्याबद्दल पंतप्रधानांनी इटलीला धन्यवाद देऊन जी20 गटाच्या नेत्यांना भारतात येण्याचे आमंत्रण दिले आहे. सन 2022 भारतीय स्वातंत्र्यास 75 वर्षे पूर्ण होत असल्याने त्या वर्षी जगातील 20 प्रमुख अर्थव्यस्थांच्या शिखर परिषदेच्या आयोजनास अधिक महत्त्व आले आहे.

” सन 2022 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या खास वर्षी भारत जी 20 गटाच्या नेत्यांचे स्वागत करण्यास उत्सुक आहे. जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असणाऱ्या भारतात या. भारताचा समृद्ध इतिहास आणि विविधता जाणून घ्या. भारताच्या अगत्यशील आतिथ्याचा आनंद घ्या…..’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यानंतर ट्‌विट केले आहे.

What is your reaction?
4 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)