पुणे – कचराकुंड्या तुंबणे सुरू

ग्रामस्थांचे आंदोलन : पालिकेची सहा वाहनांवर दगडफेक

पुणे – उरुळी देवाची येथील कचरा डेपोवर पालिकेची वाहने येण्यास ग्रामस्थांनी मज्जाव केला आहेत. त्यामुळे आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी कचऱ्याचे ढीग साचल्याचे दिसून आले. तर, मध्यवर्ती पेठांमध्ये साचलेला कचरा तातडीने उचलण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे. दरम्यान, बुधवारी दिवसभर वाहनांमध्येच कचरा साठवून ठेवत ही वाहने कचरा हस्तांतरण केंद्रावर ठेवण्यात आली. तर, संतप्त गावकऱ्यांनी कचरावाहक 6 गाड्या मंगळवारी आणि बुधवारी फोडल्या. त्यामुळे तणाव निर्माण झाला.

-Ads-

कचरा डेपोग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण करण्यासाठीच्या मागण्यांसाठी फुरसुंगी ग्रामस्थांनी पुन्हा कचराबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे डेपोवर येणारी वाहने ग्रामस्थांनी बंद केली आहेत. तेथे दररोज 700 ते 800 टन कचरा टाकला जातो. त्यासाठी सुमारे 45 ते 50 वाहने डेपोवर जातात. या वाहनांच्या दररोज 125 ते 130 फेऱ्या होतात,. त्यामुळे ग्रामस्थांनी मंगळवारी रात्रीपासून डेपोवर येणारी वाहने अडविणे सुरू केल्याने दिवसभरात सुमारे 700 ते 800 टन कचरा महापालिकेने रॅम तसेच वाहनांतच ठेवला. कचरा असल्याने काही वाहने पुन्हा उपलब्ध न झाल्याने मध्यवर्ती पेठांमध्ये कचरा साठला असून त्याचे प्रमाण 15 ते 20 टक्के आहे. सध्याच्या कचऱ्याबाबत पर्यायी व्यवस्था निर्माण होताच, हा कचराही तातडीने उचलला जाणार असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
गेल्या दोन दिवसांत महापालिकेच्या पाच ते सहा कचरागाड्या फोडण्यात आल्या आहेत. फुरसुंगी रेल्वे उड्डाणपुलाखाली ही तोडफोड झाली असून महापालिकेच्या वाहन विभागाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यामुळे कचरा वाहतूक करणाऱ्या चालक तसेच कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यांच्याकडून कामास नकार दिला जात आहे. त्यामुळे कचरा वाहतुकीची गती मंदावल्याचेही पालिकेच्या वाहन विभागाने म्हटले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)