मोदींना पाडण्यासाठी अनेक मुस्लिम आणि ख्रिश्चन देशांकडून ‘फंडिंग’ – रामदेवबाबा

जोधपूर : योगगुरूपासून ते देशातील एक आघाडीचे उद्योजग असा प्रवास करणाऱ्या रामदेवबाबा यांनी आज राजस्थानातील जोधपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना आगामी लोकसभा निवडणुकांबाबत एक गंभीर स्वरूपाचा दावा केला आहे.

एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले असून रामदेवबाबा यांनी, “आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये देशातील देशद्रोहींनी तथा जगाच्या पाठीवरील अनेक मुस्लिम आणि ख्रिश्चन देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पडावे यासाठी हजारो कोटी रुपये दिले आहेत.” असा दावा केला आहे.

मात्र आपल्या दाव्यामध्ये योगगुरू रामदेवबाबा यांनी हे हजारो कोटी रुपये कोणाला देण्यात आले आहेत तथा याबाबतची माहिती त्यांना कोणी उपलब्ध करून दिली याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही.

https://twitter.com/ANI/status/1118497059668021248

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)