“एफटीआयआय’चा आजपासून “ओपन डे’

पुणे – चित्रपट क्षेत्रातील अभिनयाचे धडे देणारी “फिल्म अॅॅन्ड टेलिव्हीजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ ही संस्था सर्वसामन्यांना पाहता येणार आहे. येत्या 11 व 12 ऑगस्ट रोजी “एफटीआयआय फॉर पुणे, पुणे फॉर एफटीआयआय’ शिर्षकांतर्गत “ओपन डे’ उपक्रम राबविला जाणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून सुरक्षतेच्या कारणास्तव संस्थेमध्ये सर्वसामान्यांना प्रवेश नाकारण्यात येत होता. मात्र, 2 वर्षांपासून संस्थेच्या वतीने “ओपन डे’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. “एफटीआयआय’ नेमकी कशी आहे, आतमध्ये कशाप्रकारे काम चालते, असे अनेकांना कुतूहल असते. आमदार विजय काळे व शनिवारवाडा कला महोत्सव समितीने पुणेकरांना संस्था पाहाता यावी यासाठी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता, त्याला यश मिळाले. त्यानंतर प्रशासनाने वर्षातून दोन दिवस संस्था सामान्यांसाठी खुली करण्यास मान्यता दिली. या उपक्रमामुळे प्रभात संग्रहालय, चित्रपट निर्मितीचे तंत्रज्ञान, अभिनय, दिग्दर्शन, संपादन, दूरचित्रवाणीचा स्टुडिओ, ध्वनीमुद्रण तंत्रज्ञान याची माहिती मिळणार आहे. शनिवार (11 ऑगस्ट) ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि महिलांना प्रवेश दिला जाणार आहे. रविवार (12 ऑगस्ट) रोजी इतरांना प्रवेश राहणार आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)