7 जानेवारी ते 13 जानेवारी 2019 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे

मेषेत हर्षल, कर्केत राहू, वृश्‍चिकेत गुरू, शुक्र धनुमध्ये रवी, शनी, बुध व प्लुटो मकरेत, केतू कुंभेत नेप्च्यून तर मीनेत मंगळ आहे. ग्रहमानाचा लाभ मिळेल. पूर्वी केलेल्या कामातून यश मिळेल. चांगल्या घटना घडतील. मन आनंदी व सकारात्मक राहील. आरोग्य उत्तम राहील. प्रियजनांचा सहवास लाभेल.

कामाचे फळ मिळेल 

ग्रहाची मर्जी तुमचेवर आहे. चांगल्या घटनांची नांदी होईल. व्यवसायात पूर्वी केलेल्या चांगल्या कामाचे फळ मिळेल. नवीन कामे मिळतील. पैशाची स्थितीही समाधानकारक राहील. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांची कामात मदत मिळेल. वरिष्ठ कामा निमित्ताने एखादी सवलत देतील. जोड धंद्यातून विशेष लाभ व्हावा. महिलांचा उत्साह द्विगुणीत होईल. घरात कुटुंबांसमवेत विशेष कार्यक्रम ठरवाल. प्रियजनांच्या भेटीचे योग येतील.
शुभ दिनांक : 7,8,9,10,11 

व्यवसायात सतर्क रहा 

आर्थिक घडी नीट बसवून कामाला लागा. कामाचे नियोजन, कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी उपयोगी पडेल. व्यवसायात सतर्क राहून सभोवतालच्या हालचालींवर नजर ठेवा. फायदा मिळवून देणारे काम मिळेल. नोकरीत जादा भत्ते व सुविधा मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल. नवी नोकरी शोधणाऱ्यांना यश मिळेल. नवीन ओळखी होतील. एखादी सुवार्ता आनंद देईल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी मिळेल.
शुभ दिनांक : 7,8,9,10,11,12,13. 

कार्यक्षेत्रात यश 

मनात बरेच बेत असतील ते प्रत्यक्षात साकार करण्याचा विचार असेल. व्यवसायात नवनवीन प्रयोग कराल. तुमच्या कार्यक्षेत्रात यश मिळेल. जाहिरात व प्रसिद्धी माध्यमांचा वापर करून व्यवसायात वेगळी उंची गाठू शकाल. योग्य व्यक्‍तींची योग्य वेळी बहुमोल मदत मिळेल. कमी श्रमात जास्त यश मिळेल. घरात इतर व्यक्‍तींना खुष ठेवण्याचा प्रयत्न राहील. महिलांना आवडत्या छंदात वेळ रमविता येईल.
शुभ दिनांक : 10,11,12,13. 

कामांना चालना मिळेल 

ग्रहमान सुधारल्याने कामांना वेग येईल. इच्छापूर्तीचा आनंद मिळेल. कष्टाच्या प्रमाणात यश हे मात्र लक्षात ठेवा. व्यवसायात जुनी येणी वसूल होतील. कामानिमित्ताने नवीन हितसंबंध जोडले जातील. नोकरीत तुमच्या पद्धतीने काम कराल. कामाचे समाधान मिळेल. परदेशगमन व परदेश व्यवहाराच्या कामांना चालना मिळेल. घरात सुवार्ता कळेल. एखादे मंगल कार्य होईल. पाहुण्यांची ये-जा राहील.
शुभ दिनांक : 7,8,9, 12,13. 

कामात प्रगती 

गोंधळाची स्थिती कमी होऊन ठोस निर्णय घेऊ शकाल. बऱ्याच प्रश्‍नांची उकल झाल्याने हायसे वाटेल. व्यवसायात आशावादी दृष्टिकोन लाभदायी ठरेल. कामाची आखणी योग्य प्रकारे करून कामात प्रगती साधाल, विनाकारण वाढलेले खर्च आटोक्‍यात आणाल. नोकरीत वरिष्ठ वेगवेगळ्या पद्धतीचे काम तुमचेवर सोपवतील. घरात महिलांना स्वास्थ्य अनुभवता येईल. चांगल्या गोष्टीचे चिंतन करता येईल.
शुभ दिनांक : 10,11. 

विचार,कृती यांची सांगड 

काही ठोस पावले उचलून कामात झालेला विलंब कमी करण्याचा प्रयत्न करा. विचार व कृती यांची योग्य सांगड घालून कामे उरका. निर्णय घेतांना निष्णात व्यक्‍तींचा सल्ला घ्या. नोकरीत स्वयंसिद्ध राहून कामे करा. सहकारी व वरिष्ठांकडून कुठलीही अपेक्षा ठेऊ नका. घरात महिलांना सहजीवनाचा आनंद घेता येईल. प्रवासाचे बेत ठरतील. मित्रमंडळी व आप्तेष्टांच्या भेटीगाठी होतील.
शुभ दिनांक : 7,8,9,12,13. 

दगदग धावपळ वाढेल 

अडी-अडचणींवर मात करून प्रगती करण्याचा विचार राहील. प्रियकराशी जुळवून घ्या, त्यामुळे दगदग धावपळ वाढेल. प्रियकराची मनोकामना पूर्ण कराल. प्रिय व्यक्तींना मान द्याल. नोकरीत वरिष्ठ आवळा देऊन कोहळा काढीत नाही ना? त्यावर लक्ष ठेवा. फार धावपळ न करता शांतपणे जेवढे झेपेल तेवढेच काम करा. कामातील बेत गुप्त ठेवा. बोलघेवडेपणा महागात पडू शकतो. महिलांनी वादविवादात पडू नये.
शुभ दिनांक : 7,8,9,10,11, 

उलाढाल वाढवाल 

“रात्र थोडी सोंगे फार’ अशी अवस्था तुमची असेल. व्यवसायात प्रसिद्धीमाध्यमांचा वापर करून उलाढाल वाढवाल. प्रतिष्ठित व्यक्‍तीचा पाठिंबा मिळेल. हातातील कामे पूर्ण केल्याशिवाय उसंत मिळणार नाही. नोकरीत वरिष्ठांची मर्जी तुमचेवर राहील केलेल्या कामामुळे वरिष्ठ खुष होतील. बढती व पगारवाढीची शक्‍यता. कौटुंबिक समेट घडेल. महिलांना पाहुण्यांची सरबराई करण्यात वेळ खर्ची पडेल.
शुभ दिनांक : 7,8,9,10,11,12,13. 

प्रवास योग 

प्रगतीचा आलेख चढता राहील त्यामुळे कामाचा हुरूप वाढेल. व्यवसायात आर्थिक कारणाने लांबवलेली कामे हाती घेऊन मार्गी लावाल. कामांना योग्य दिशा देऊन नव्या दमाने वाटचाल कराल. नोकरीत कंटाळवाणे पर्व संपेल. त्यामुळे नवीन कामची धुरा यशस्वीपणे घेऊ शकाल. कामानिमित्ताने प्रवास घडेल, घरात वातावरण प्रसन्न राहील. महिलांना कलागुण दाखवण्याची संधी मिळेल.
शुभ दिनांक : 7, 8, 9,10,11,12,13. 

खर्चावर नियंत्रण ठेवा 

कामात अचानक बदल झाल्यामुळे तुम्ही थोडे गोंधळात पडाल. मात्र प्रश्‍नांची उकल योग्य रितीने करून कामांना गती द्या. व्यवसायात खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. उधार उसनवार शक्‍यतो टाळा. नवीन कामे मिळवतांना हितचिंतकांची मदत मिळेल. नोकरीत आपले काम चोख पार पाडा. वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. नकळत झालेल्या चुका निस्तरण्यात वेळ जाईल. प्रकृतीकडे लक्ष ठेवावे.
शुभ दिनांक : 7,8,9,10,11,12,13. 

खरेदीचा मोह 

चांगल्या ग्रहमानामुळे हातून चांगल्या पद्धतीने व कल्पकतेने कामे कराल. व्यवसायात सभोवतालच्या व्यक्‍तींना खुषीने सांभाळून घ्यावे लागेल. ताबडतोब कोणतेही निष्कर्ष काढू नका. पैशाचे निर्णय घेताना सावधानता बाळगा. नोकरीत “ऐकावे जनाचे करावे मनाचे’ असे वागा. कामातील बेत गुप्त ठेवा. घरात नवीन खरेदीचा मोह होईल. तरी जरा जपून!
महिलांनी सहकाऱ्यांचे बोलणे ऐकून नंतर त्याप्रमाणे कृती करावी.
शुभ दिनांक : 10,11,12,13. 

तडजोड करावी 

संमिश्र ग्रहमान लाभले आहे. “मानले तर समाधान मिळेल’ व्यवसायात बारकाव्याकडे लक्ष ठेवा. स्पर्धकांच्या हालचाली पाहून तुमचे धोरण ठेवा. जुनी येणी हाती पडण्यास थोडा विलंब होईल. तरी जपून खर्च करा. नोकरीत नवीन व्यक्‍तींशी जुळवून घेताना तडजोड करावी लागेल. कामामुळे नवीन हितसंबंध जोडले जातील. घरात दुरुस्ती, इतर खर्च यामुळे खर्च प्रमाणाबाहेर जाईल. आरोग्य मात्र उत्तम राहील.
शुभ दिनांक : 7,8,9,12,13. 

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)