मैत्री…. (प्रभात open house)

तुझी माझी असावी मैत्री फुलासारखी. ..
शेवटपर्यंत सुगंध देणारी  
मनसोक्त गंध लुटणारी. …!!

ही कविता माझ्याच “संगीतपुष्प” या काव्यसंग्रहातील आहे. ही माझी अतिशय आवडती अशी कविता आहे. त्यालाही कारण तसेच आहे. जीवनामध्ये मैत्री हीच सर्वश्रेष्ठ  आहे का? मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे. तो सर्व काही सोसू शकतो फक्त एकटेपणा सोडला तर. मला मात्र पुष्कळ मित्र-मैत्रिणी आहेत बरं…!!

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मैत्रीचं हे नातं रक्ताच्या नात्यापेक्षाही वेगळ असतं असं हे मैत्रीचं नातं विश्वासावर, प्रेमावर उभारलेलं असतं. कितीही तोडायचा प्रयत्न केला तरी ते न तुटणारं नातं असतं. खऱ्या मैत्रीमध्ये वय, जात, स्त्री -पुरूष भेद, सामाजिक दर्जा, धर्म हे कधीच आड येत नाही. तर “मित्रता” ही कोणतेही “धन” तोलू शकत नाही आणि शकणारही नाही.

खरी मैत्री ही सुखातही व दुःखातही आपल्या बरोबर असते. आपल्या सुखात आनंदी तर दुःखात वाटेकरी होऊन मदतीला धावून येणारी असते. पित्याप्रमाणे मार्गदर्शनही करते तर मातेप्रमाणे मायेची पखरणही करते. चांगल्या गोष्टींकडे जाण्यास प्रवृत्त करते. अशी ही खरी मैत्री आपल्या जीवनात सुखाची अनुभूती तर देतेच पण जगण्याचीही प्रेरणा देते व प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्या जीवनातील गोडी वाढविते व जीवन चेतनामय करते. अशी ही मैत्री स्वतः अनुभवली व अजूनही अनुभवत आहे. मैत्री ही खूप छान भावना आहे. मैत्री जितकी जुनी व दणकट तितकीच नाजूकही असते. ती काळजीपूर्वक जपावी लागते.

“मैत्री ही हक्काची जागाही आहे बरं “!!!
मैत्री म्हणजे ओढ आठवण असते 
आयुष्यातील न संपणारी साठवण असते 
मैत्री म्हणजे विश्वास अभिमान 
आपल्या जीवनातील जगण्याचा स्वाभिमान. ..!!

अशी ही मैत्री मला नशिबाने मिळाली. ती अजूनही तीस (30) वर्षे झाली तरी टिकून आहे. ह्या मैत्रीचा सुगंध  अधिकाअधिक बहरत आहे. अगदी नुकत्याचं उमललेल्या फुलांच्या सुगंधासारखा ताजा-टवटवीत. आम्हाला  एकमेकांशिवाय अजिबात करमत नाही. एकमेकांविषयी गैरसमज तर होतच नाही उलट अधिकच आमची ही मैत्री घट्ट होत गेली अगदी भक्कम न तुटण्यासाठी.

“मैत्री ही फुलवलेल्या सुंदर बागेसारखी सुगंधीत असते. तर निसर्गदत्त देवराईसारखी देखभाल न करताही हिरवीगार घनदाट अशी  असते.” अशी मैत्री मला लाभली व मी त्याचा सुखद असाही अनुभव घेतला आणि अजूनही तो घेत आहे. अशा या माझ्या मैत्रीने मला खूप काही दिले आणि अजूनही ती देतच आहे. मग मी माझ्या लेखणीतून कागदावर कशी नाही  उतरवणार?

आणि ती मी मैत्री तुझी नी माझी कागदावर उतरवली. अशी ही माझी मैत्री…

– संगीता कुलकर्णी, लेखिका / कवयित्री 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)