मित्रासाठी काय पण… (प्रभात open house)

मित्र हा शेवटी मित्रच असतो तो कधीही आपला शत्रू नसतो. तो आपल्या जीवाची बाजी आपल्या दोस्तासाठी लावत असतो. त्याला आपल्या जीवापेक्षा आपला जीवलग मिञ हवाहवासा असतो. त्यासाठी तो काय पण करण्यास तयार असतो, असे अनेक किस्से माझ्या जीवनात घडले आहेत. त्यातील काही किस्से आपल्या मित्रासाठी सांगत आहे.

साधारण मी पदवीचे शिक्षण घेऊन जग काय असते ते पञकारी माध्यमातून पाहत होतो. पत्रकारीता जोरात सुरु होती. समाजात मान-सन्मान मिळत होता. मनाला मोठे समाधान होत होते व समाजातील काही प्रश्न आपण लेखणीच्या माध्यमातून सोडवत होतो. माञ खिशात एक ही दमडी नव्हती. समाजात पूर्ण आधिकार होता, पण तो सर्व काही बिनपगारी होता. कारण पत्रकारीतेच्या माध्यमातून मिळणारे मानधन हे असते मान म्हणून होते. त्यातून आपला संसाराचा गाडा पुढे नेणे तसे अवघडच होते. त्यास साध दिली ती माझ्यावर जीवापाड प्रेम कणाऱ्या साथीदारांनी साथ दिल्याने शितल्याचा शितल झालो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पत्रकारीतेत पगारबिगार नसतोच पण समाजाच एक चांगल काम होत होत म्हणून मी याच्या जोडीला पेपरचा गठ्ठा भल्या पहाटे पेपर विकणाऱ्याकडे देण्याचे पायलटचे काम मी हाती घेतले. माझी मोटारसायकल रोज पहाटे पाच वाजता तिरकवाडीहून फलटण एसटी स्टॅन्ड गाठत होती व साताराहून येणाऱ्या गाडीतील पेपरच्या गठ्याने माझी मोटारसायकल पूर्ण होऊन जात होती व तीही मोटारसायकल मित्राचीच होती. ती गाडी घेऊन जात होतो तेही मिञाने भरुन दिलेल्या पेट्रोलवर जात होतो. कारण त्यावेळी खरोखरच माझ्याकडे एक दमडीही नव्हती. मी प्रामाणिक असल्याने मला भेटणारा दोस्त माझ्यासाठी काय पण करण्यास तयार होते. वारा असो थंडी पाऊस असो वा आपण आजारी असलो तरी दररोज पेपर न चुकता पेपर विकणाऱ्या पर्यंत नेण्याची जबाबदारी माझी होती. त्यातून मला थोडेफार पैसे मिळू लागले. मित्राची मोटारसायकल किती दिवस वापरायची म्हणून मी स्वतःची मोटारसायकल नातेवाईक व दोस्ताकडे उसणवार करुन कोरी करकरकरीत गाडी एकदाची घेतली.

गाडी माझी रस्त्यावर धावत होती ती दोस्तामुळेच कारण महेश नावाचा मित्र हा बारामती मध्ये शिक्षक होता. तो दररोज एसटीने कधी मोटार सायकलवर बारामतीस जात असे. माझे ऑफिस स्टॅन्ड जवळ असल्याने तो माझ्याकडे येत असे व माझी गाडी विनाकारण फिरवायला नेत असे. विनाकारण हा गाडी कशाला नेतो मला समज नव्हते. माझ्या गाडीचे अॅॅव्हरेज वाढत होते. एक दिवस निवांत होतो गाडी सर्व्हिसिंग करायला घेऊन गेलो. गाडी नीट करणाऱ्याने गाडीची तपासणी केली. हे गेलय कार बोरेटर जरा खराब आहे, नीट करून घ्या. तुम्हाला पेट्रोल कस परवडतय. हा काय बोलतोय असा माझी तर गाडी चांगला अॅॅव्हरेज देते. हा काय डोक्यावर पडलाय काय, असे मनात म्हणत होतो. तो माझ्यावरच ओरडला माझ्याकडे नुसते बघता काय मी काय जोकर वाटलो कि काय अव्हरेज देती तुमची गाडी सांगा. मी म्हणालो 70  ते 80 देते असे म्हणालो. तर तो हसू लागला तो ही नीट करणारा तसा मित्रच होता तो म्हणाला तुमच्या कंपनीची गाडी 50 ते 60 पर्यंतच अॅॅव्हरेज देते. कुणालाही विचारा या कंपनीची गाडी काय अॅॅव्हरेज देते ती आदी पाहा. मी एक दोन ठिकाणी व थेट जिथून गाडी घेतली तेथे विचारपूस केली. गाडी नीट करणारा खरे बोलत होता. पण माझी गाडी अॅॅव्हरेज जास्त देत होती हे पण माझ्या दृष्टीने खरे होते. घोड कुठ तरी पेंड खाते आहे. याची मला खात्री झाली व फिटर म्हणाला, या कंडीशनमध्ये तुमची गाडी 35 ते 40 अॅॅव्हरेज देते. नीट केल्यास कंपनीप्रमाणे गाडी अॅॅव्हरेज देईल तुमच्या नकळत कोणीतर गाडीत पेट्रोल भरत आहे, असे म्हंटल्यावर माझी ट्यूब पेटली हा महेश रोज विनाकारण गाडी घेऊन जातो हाच रोज पेट्रोल भरतो. याची खात्री झाली गाडी ठिकठाक करुन आणली. नेहमीप्रमाणे महेशने गाडी दे, माझे काम आहे. लगेच आलो. पण मी त्याच्याकडे बघतच राहिलो हा रोज आपल्या गाडीत पेट्रोल टाकतोय पण आपणास सांगत नाही का म्हणून मी त्यास म्हटले, कशाला गाडी नेतो गाडी ठिक केलीये. तू गाडी नेलीतर गाडीचे अॅॅव्हरेज वाढेल म्हटल्याबरोबर तो हसला. तो म्हणाला तुला कस कळले. मी सर्व हकिगत त्यास सांगितले. तो म्हणाला, तू मी देऊ केलेले पैसे घेतले नसते तू मी नसताना माझी घरची काम करतो. त्या बदल्यात काहीतरी द्याव म्हणून हा उद्योग करत होतो. आजपासून हे बंद कर मला पेपर टाकणारे पेपरवाले पेट्रोलचे पैसे देतात. तू पेट्रोल भरत जाऊ नकोस, असे त्यास सांगावे लागले. तो महेश सध्या ह्यात नाही पण सच्चा दोस्त कायमचा हरवल्याचे दुःख होत आहे.

असाच पण वेगळा दुसरा वेगळा किस्सा सांगतो, पायलट गाडी दररोज न चुकता फलटण-बारामती करत होती. मला ताप आला होता. त्याबाबत घरी जाताना किरणला सांगितले होते. तर किरण म्हणाला, तू पहाटे मला फोन कर. तू एकटा जाऊ नकोस आजारी आहेस. मी नेहमीप्रमाणे पहाटे गाडी चालू केली की दोन ते तीन मिनटात मोबाईल वाजला तर किरणचा फोन होता. तो म्हणाला, शहाण्या कुठाय तू मी वाट बघतोय लवकर ये. मी वाटेत होतो आलो दहा मिनटात येतो. पण तू नाही आला तरी चालेल. मी ठिक आहे. मला शिकवू नकोस पटकन ये मी वाट पहातोच सकाळच्या वेळी नाही म्हणायच नसत म्हणून त्याच्याकडे गेलो. तो माझ्या पाठीमागे बसला व गप्पा मारत फलटण एसटी स्टॅॅन्ड गाठले. पेपर गाडीवाला राहूल वाटच बघत होता. आज थोडा लेट किरण शेठ जोडीला का आज तुमच्या असे म्हणत असताना बारामती रूटचे सर्व पेपरचे गठ्ठे माझ्या पुढे टाकले. रुटप्रमाणे गठ्ठे लावले. गाडीला पिशव्या अडकवल्या. राहिलेले गठ्ठे पेट्रोल टाकीवर ठेवले. गाडीवर बसणार होतो तितक्यात किरण म्हणाला, शहाण्या मला पाडशील बिडशील, त्यात तुला ताप येत आहे. तू मागे बस मी काय त्याच्यासमोर बोलायची हिमत करतोय. तो आपल्यासाठी आलाय बसा मागे, असे मनात म्हणत मोटारसायकलवर किरणच्या पाठीमागे बसलो.

बारामती दिशेने आमची गाडी रस्त्याच्या कडेला पेपर विकणाऱ्याकडे गठ्ठे देत बारामती शहरात घुसत होती. रस्त्याच्या मधोमध डिव्हायडर होते. आमच्या गप्पाही रंगात आल्या होत्या. अचानक एक कुत्र डिव्हायडरच्या पलिकडून जोरात पळत आले. गाडी एवढी जोरात नव्हती. पण, अचानक गाडीखाली कुत्र आल्याने व गाडीचा ब्रेक दाबल्याने गाडी पडली. तसा किरण मोठ्याने ओरडला, आय ग, असा आवाज आला. मी पाठीमागे होतो. पेपरच्या पिशव्यामुळे मला थोड फार लागल होत. किरण माञ लवकर गाडी उचल म्हणत होता. त्याच्या डोळ्यात वेदनेने पाणी आले होते. गाडी पटकन बाजूला घेतली. काय कराव सुचत नव्हत. किरण विव्हळत होता. त्याला वेदना असहय होत होत्या. त्याचा पाय मोडल्याचे साधारण पाहिले व मला माझ्या अगोदर बारामतीत मुलांची ने-आण करणाऱ्या भाडळीचे बोकेला फोन लावला. तो म्हणाला, काय काळजी करु नका, मी एकच मिनटात तेथे आलो. मला थोडा आधार आला. मला पाठीला व हाताला मुकामार लागला होता. माञ किरणला जबर लागले होते. किरण काय करायचे बारामतीच्या हॉस्पिटला अॅॅडमिट व्हायच का फलटणला जायच काय करायच. आपण दोघे एकुलते एक. आपल्याला काय झाले म्हटले की घरादारासह मिञ मंडळीची धावाधाव होईल. त्यापेक्षा फलटणला डॉ.प्रसाद जोशी चांगले आहेत. त्यांचेकडे अॅॅडमिट होऊ असे ठरले. तोपर्यंत बोके तेथे आला. त्याने सर्व पाहिले तुम्ही आपली मोटारसायकल बारामती स्टॅॅन्डला लावा. मी पॅगो बघतो, असे म्हणत त्याने पॅगो गाडीवाल्याला फोन लावला व मला म्हणाला, स्टॅन्डसमोर एक गाडी या नंबरची त्याच्यात बसून ये. किरण आहे. तेथे मी पॅगोमध्ये बसून किरण जवळ आलो. किरणला मी व बोके याने पॅगो ड्रायव्हच्या मदतीने. गाडीत ठेवले व मीही पॅगोत बसलो व डॉ.जोशीकडे फलटणला निघाला. पॅगोवाला हळू गाडी चालवत होता. कारण गाडीला धक्का व हादरा बसला कि किरणला त्रास होत होता. गाडी चालू होती किरणने निवडक मिञाची नावे सांगितली. यांना फोन लाव घरी सांगू नका. सरळ डॉ. जोशी यांचे हॉस्पिटलला या थोडे लागले आहे. पॅगो हॉस्पिटला पोहचण्याअगोदर फोन केलेले सर्व हजर होते. त्यांनी स्टेचर आणून किरणला दवाखान्यात नेले. डॉ. जोशींना आधीच मित्रांनी कल्पना दिली.  मला काहींनी आधार दिला. त्यांना धरून मी किरणला तपासत होते तेथे गेलो. तर डॉ. जोशी म्हणाले, हाड फ्रॅॅक्चर झाले आहे. पटी टाकावी लागले, असे म्हणत मला तपासले यांना किरकोळ मुकामार लागला आहे. दोघांना एकाच रुममध्ये अॅॅडमिट करून उपचार सुरू केले नंतर दोघांच्या घरी काय झाले ते सांगितले. घरच्यांची पळापळ झाली. सर्वांनी हॉस्पिटल गाठले आमची विचारपूस केली.

हे होत असताना एकाने किरणच्या वडिलांना भलतेच सांगितले. शितलच गाडी चालवत होता. त्यानेच तुमच्या किरणचा पाय मोडला आहे. शितलवर पोलीस केस करा, असे उलटे सुलटे सांगितले. याबाबत किरणच्या दादांनी किरणला खर काय सांग, असे विचारले. तर किरण म्हणाला, शितलची व माझी पण चूक नाही. कुत्र अचानक आल्याने हे घडल्याचे सांगून मी स्वतः गाडी चालवत होतो, असे सांगितले दादा शांत झाले

मी दवाखान्याचे बिले देऊ शकत नाही. हे किरणला माहित असल्याने माझे व किरणच्या सर्व दवाखान्याचे बिल किरणने भरले. दोस्त काय असतो ते समजले. पण माझ्यामुळे किरणचा एक पाय कायमचा अधू झाला. ही गोष्ट कायम मनात आहे.

– शितल लंगडे (तिरकवाडी, ता.फलटण, जि. सातारा)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)