मैत्री हे देवाचं वरदानच…(प्रभात open house)

मैत्री हे नाव ऐकताच चेहऱ्यावर एक हलकंसं स्माईल येऊन जातं.
मला तर मैत्री हे देवाचं वरदानच वाटतं.

मी M. Tech ची विद्यार्थिनी आहे. कॉलेजला ऍडमिशन घेतलं तेव्हा आम्ही 12 च जणांची बॅच आहे हे कळलं. त्यामुळे आमची मैत्री घट्ट होणार हे माहित होतं पण इतकी घट्ट होईल असं नव्हतं वाटलं.
माझ्या या अंतरंगी मित्रांशी असलेल्या मैत्रीचे रंग मी तुम्हाला सांगणार आहे.
माझ्या मैत्रीचा प्रवास सुरु झाला प्रिया पासून. तिला भेटले तेव्हा ती माझी मैत्रीण कमी मित्रच जास्त वाटत होती. तिचं वागणं बोलणं अगदी मुलांसारखं. हळूहळू ओळख झाल्यावर कळलं खूप निरागस आहे ती. अगदी लहान मुलांसारखी. आणि खूप घट्ट अशी मैत्री निर्माण झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अनिल विलास शंतनू ओंकार हे तर माझे घट्ट मित्र होऊन गेले.
अनिल विषयी बोलायचं तर अगदी जिवाभावाचा मित्र झाला तो. कधी खट्याळ पणे माझी मस्करी करणार तर कधी अगदी वडिलांसारखा आधार देणार.
विलास ने तर माझं आयुष्यच बदलून टाकलं. आता काहीही करायचं झालं तर ते मी आधी विलास ची चर्चा करून व त्याची परवानगी घेऊनच करते.

सर्वात भारी म्हणजे आमचे शंतनू राजे. त्यांचा थाटच वेगळा. कधी हा मूड तर कधी तो. कधी एकदम थट्टा मस्करी तर कधी सिरीयस. पण मनाने एकदम साफ व प्रेमळ अशी personality.
माझा प्रोजेक्ट पार्टनर पोपट. अतिशय शिस्तप्रिय . पण जेव्हा गोष्ट मैत्रीची असते तेव्हा पोपट स्वतःचे नियम मोडायला मागेपुढे पाहत नाही. खूप sincere व दिलदार मनाचा असा हा मित्र.
ओंकार तर नेहेमी हसतमुख राहणार. आम्हालाही अगदी फ्रेश वाटतं त्याच्यासोबत असल्यावर. खूप भारी मित्र झाला तो. अगदी focused माणूस.

यामध्ये एक कलाकार मित्र भेटला तो म्हणजे ऋषी. खूप जणांना कलेची पूजा करताना बघितलं पण कलेतून जीवनाचा आनंद घेणारा हा पहिलाच पाहिला.
आमच्या क्लास ची एक famous जोडी म्हणजे सौरभ आणि निखील. Dr. हुलवान सरांचे प्रिय विद्यार्थी एक topper आणि दुसरा bodybuilder. आमच्या सगळ्या कार्यक्रमांचे कर्ताधर्ता हेच.
आमच्या क्लास ची दुसरी famous जोडी म्हणजे अमित आणि राहुल.खूप ज्ञानी माणसं. त्यांच्याकडून नेहेमीच खूप शिकायला मिळतं.

माझे हे व अनेक मित्र आज त्यांच्या कामात व जॉब मध्ये बिझी असतील पण त्यांनाही माहितीये मी त्यांची खूप आठवण काढते आणि ते सुद्धा नक्कीच मला miss करत असतील.
या सगळ्या जिवाभावाच्या मित्रमैत्रिणींना happy friendship day!!!

– रुखसार तांबोळी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)