मैत्री तुमची निस्वार्थी… (प्रभात open house)

काही माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि आपलीच होऊन जातात. रक्ताच्या नात्यापेक्षाही मैत्रीच्या नात्याला जास्त महत्त्व देणारा मी. मैत्रीची दुनिया जपत माझे आयुष्य आनंदाने उधळत आहे. कधी तरी डगमगतो, धडपडतो तेव्हा पाठीच्या भावाप्रमाणे तुम्ही दोघे जण खंबीर पाठीमागे उभा राहता. होय हे दोन अगदी नकळत्या वयापासून मित्र आहेत. छगन बारबोले आणि प्रदीप नलवडे. कायम मला आपली वाटणारी ही माणसे. तुझ्या मोठे होण्यातच आमचा आनंद आहे अशी म्हणणारे निस्वार्थ जोडीदार.

छगनचे शिक्षण कमी पण जीवनात प्रत्येक गोष्टीत खूप समृद्ध. तर प्रदीप खूप मोकळ्या मनाचा. कोणते ही गोष्ट करण्याची तयारी ठेवणारा. मित्रासाठी जीव ओवाळून देणारा. माझ्या प्रत्येक यशात या दोघांची मला भरभरून साथ लाभली आहे. आयुष्यांतील प्रत्येक दिवस तुमच्या बरोबर असावा. निस्वार्थ मन, मोकळी भावना तुमच्याकडून शिकत आहे. आज आपण प्रत्येक जण आपल्या कामात गुंतलो आहे तरीही तुमची आठवण मनाच्या कोप-यात अजूनही तितकीच जवळची आहे. कधी गावात गेलो तर या दोघांना भेटलो की सगळे दुःख विसरुन जातो. प्रत्येक निर्णय, प्रत्येक पाऊल तुमच्या साथीने चालत आलो आहे. आयुष्यभर आपली मैत्री जपू या. मैत्री अशी तुमच्या सारखीच निस्वार्थ, आनंदी असावी एवढीच इच्छा.

-Ads-

– अविनाश देशमुख


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)