मित्र जीवाचे…! (प्रभात open house)

“मैञीत नसते जात
असावा फक्त विश्वास
हाती घेऊन हात
करावा जीवन प्रवास”
   “मैञी “हा शब्द अनेक अर्थाचे पैलू उलगडतो.खरच…मैञी म्हणजे,हळव्या नात्यांचा गोड ऋणानूबंध,खर तर…मैञी हक्काची,विसाव्याची आणि विश्वासाची जागा. मनातील भावना व्यक्त करण्याच हक्काच व्यासपीठ.
         मै- मैफिल /मैञिण, आणि ञी-ञिकालबाधी मैफिल
 मैञ जीवाचे प्रित फुलांचे,मैञी पाविञ्याचा अविष्कार…अंर्तमनातला धुंद होकार…मैञी म्हणजे अनमोल भक्तीभाव…मैञी म्हणजे जगण्याचे सामर्थ्य…मैञीत नसावा स्वार्थ…मैञी म्हणजे सुख दु;खाचा आर्थ…मैञी म्हणजे आयुष्याचे इद्रधनुष्यी रंग…मैञीचे नाते म्हणजे श्वास आणि आयुष्याचे…समुद्र आणि लाटाचे…मैञी म्हणजे दोन मनाला जोडणारा धागा,मैञी म्हणजे चेतना,मैञी म्हणजे उल्हास,मैञी म्हणजे त्याग,मैञी म्हणजे विश्वास,मैञी म्हणजे सुखद क्षणांची बरसात,मैञीत असते एकमेकांसाठी जगण्याची आस.मैञी म्हणजे रेशमी बंध…मनात दरवळणारा आपलेपणाचाा भावगंध!!!
मैञी असते स्वच्छंदी  फुलपाखरासारखी…मनसोक्त बहरलेल्या वसंतासारखी,मैञी असावी पिंपळ पानासारखी निरंतनजपून ठेवावीशी वाटणारी,या मैञी मध्ये जात,धर्म,पंथ,वय याच बंधन नसत…कारण,मनाशी मन जुळली की -ह्रदयाच्या तारा अलगद छेडल्या जातात…त्यावेळी माया,ममता,विश्वास,त्यागाच्या वेलीवर ती धुंदपणे बहरते, मोहरते… आयुष्याच्या या खडतर मार्गात एकमेकांना एकमेकांची साथ मीळते. मैञी असावी नजरेत भरणारी, मनात सामावणारी, सदैव हवीहवीशी वाटणारी… अबोलाहूनही अबोल, मनातल गुज ओळखणारी…सागराहुनही खोल, तेजळणाऱ्या ज्योतीसारखी प्रकाशित होउन मार्ग दर्शवणारी, मनामनात खोलवर रुतलेली…निस्वार्थिभावनेने सदैव फूलणारी… मैञीच हे अनमोल नात ज्याला कुणाला भेटल ते खरच, ते खूप नशिबवान असतात.
“तुझं नि माझ मैञीचं पविञ नातं
प्राजक्तासमान दीर्घकाळ दरवळणार
निस्वार्थी,निष्पाप,प्रीतफुलांनी
गंधित होऊन बहरत जाणार”
रुपाली वैद्य-वागरे
नांदेड
9623009981

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)