नवे तंत्रज्ञान अवगत असलेल्या फ्रेशर्सना फायदा 

टीसीएस सारख्या कंपन्या देऊ लागल्या उत्तम पगार 
बेंगळुरू: सर्वाधिक कर्मचारी असलेली भारतीय आयटी कंपनी टीसीएसने पगाराच्या तुलनेतही आयटी कंपन्यांना मागे टाकले आहे. नव्या धोरणानुसार कंपनी फ्रेशर्सना दुप्पट पगार देत आहे. यासाठी केवळ एक परीक्षा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये माहीर असावे लागणार आहे. सध्या कंपनीने 1 हजार अशा फ्रेशर्सची भरती केली आहे ज्यांना नव्या जमान्यातील डिजिटल स्कील चांगल्या प्रकारे येत आहे. आयटीमध्ये सध्या फ्रेशर्सना 3.5 लाखांचे वार्षिक पगाराचे पॅकेज दिले जाते. टीसीएस याच उमेदवारांना 6.5 लाख रुपये पगार देत आहे.
टीसीएसने उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचे स्वरूप बदलले असून ऑनलाईन टेस्ट आणि व्हिडीओद्वारे इंटरव्ह्यूमुळे देशातील कानाकोपऱ्यातील हुशार उमेदवारांपर्यंत पोहोचली आहे. याचबरोबर कॉलेजमध्ये जाऊन मुलाखती घेण्याच्या पद्धतीवरही टीसीएस कमी अवलंबून राहणार आहे.
यामुळे टीसीएसने नॅशनल क्वालिफायर टेस्ट नावाची एक पॅन इंडिया ऑनलाईन टेस्ट सुरू केली आहे. ही टेस्ट देशातील कोणत्याही ठिकाणावरून देता येते. यानंतर निवडलेल्या उमेदवारांची टीसीएसचे अधिकारी व्हिडीओद्वारे मुलाखत घेतात. कंपनीनुसार या टेस्टद्वारे कंपनी दूरवरील उमेदवारांपर्यंत पोहोचत आहे. तसेच नियुक्ती प्रक्रिया 3 ते 4 आठवड्यांत पूर्ण होते. याआधी कंपनी 370 कॉलेजांमध्ये जाऊन कॅम्पस इंटरव्ह्यू घेत होती. मात्र, ऑनलाईनमुळे टीसीएस 2000 कॉलेजांपर्यंत पोहोचत आहे.
या दुप्पट पगाराच्या नोकरीसाठी कसे पात्र व्हायचे हे टीसीएसचे एक्‍झिक्‍युटिव्ह वाइस प्रेजिडेंट अजय मुखर्जी यांनी सांगितले की, एनक्‍युटीमध्ये चांगले प्रदर्शन करणाऱ्या उमेदवारांना आणखी एक परीक्षा द्यावी लागणार आहे. यानंतर मुलाखत झाली की पगाराबाबत ठरविण्यात येणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे, मशिन लर्निंग, आर्टिफिशिअल इंटेलिजेंस आणि डेटा ऍनॅलिसिस यासारख्या स्कील असलेल्या कर्मचाऱ्यांची मोठी गरज आहे. मात्र, कंपन्यांना जुन्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी मोठा खर्च करावा लागत आहे. जर नवीन उमेदवार यासारख्या तंत्रज्ञानाने युक्त असतील तर कंपन्यांना त्यांच्यावर जादा खर्च करण्याची गरज राहणार नाही. यामुळे अशा कर्मचाऱ्यांना जादाचा पगार देण्यात येत आहे.
कंपनीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी 24 राज्यांतील 100 शहरांतून 2.8 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. जुन्या पद्धताने अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा हे प्रमाण 175 टक्के जास्त होते. आता कंपनी या कॉलेजांमध्ये जात नसून मान्यताप्राप्त कॉलेजांमध्ये हे विद्यार्थी मुलाखत देण्यासाठी येत आहेत. यामुळे वेळ आणि पैसाही वाचत असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नव्या विद्यार्थ्यांना परंपरागत तंत्रज्ञानाऐवजी नवे तंत्रज्ञान अवगत करण्याची गरज निर्माण झाल्याचे दिसून येते.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)