पॅरिस स्फोटाचा तपास करण्यासाठी फ्रेंच पथक केरळमध्ये

कोची: पॅरिसमध्ये 2015 साली झालेल्या बॉम्बस्फोटाचा तपास करण्यासाठी 5 जणांचे फ्रेंच तपास पथक केरळमध्ये दाखल झाले आहे. या बॉम्बस्फोटाशी संबंधित असलेल्या इस्लामिक स्टेटच्या संशयितांची चौकशी हे पथक करणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या तपासासाठी “एनआयए’कडून या तपास पथकाला सहाय्य केले जाणार आहे.

स्थानिक तरुणांना इसिसमध्ये ओढण्याचा आरोप
सुबहानीला 2016 साली तामिळनाडूमध्ये अटक करण्यात आली. “एनआयए’, अन्य केंद्रीय तपास संस्था आणि अन्य राज्यांच्या पोलिसांच्या मदतीने इसिसशी संबंधित काही कारवाईदरम्यान त्याला अटक झाली होती. केरळमधील काही न्यायाधीश आणि विदेशी पर्यटकांना लक्ष्य करण्याचा कट इसिसच्या हस्तकांमार्फत केला गेला होता. सुबहानी हा स्थानिक तरुणांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून भडकावण्याचे आणि इसिसकडे आकर्षित करण्याचे काम करत असे. एप्रिल 2015 मध्ये तो मक्केच्या यात्रेच्या निमित्ताने भारतातून इस्तंबुलला गेला होता. इस्तंबुलमधून अन्य पाकिस्तानी आणि अफगाणी नागरिकांसह इराकच्या सीमेमध्ये गेला होता.

केरळमधील थोदुपुझ्हा येथील रहिवासी असलेल्या सुबहानी जाहा मोइदीनची चौकशी फ्रेंच तपास पथकाकडून केली जाणार आहे. “एनआयए’च्या न्यायालयाने सुबहानीच्या चौकशीची परवानगी दिल्यावर हे फ्रेंच पथक कोचीमध्ये दाखल झाले आहे. सुबहानी सध्या थ्रिसुर येथील मध्यवर्ती कारागृहात आहे. तेथेच ही चौकशी होणार आहे, असे “एनआयए’ च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले.

पॅरिसमध्ये 2015 साली एका थिएटरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाशी संबंधित दहशतवाद्यांना सुबहानी ओळखत होता. मात्र त्याला या बॉम्बस्फोटाच्या कटाविषयी काहीही माहिती नव्हती. असे “एनआयए’च्या तपासामध्ये उघड झाले होते. या बॉम्बस्फोटात 100 पेक्षा अधिक जण मरण पावले होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)