पुसेगाव- गेल्या कित्येक वर्षापासून पुसेगाव, ता. खटाव येथील साईनगर (बेघरवस्ती) येथे संजू नलवडे राहत होता. त्याची जटा पुसेगाव येथील शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव व कार्यकर्त्याच्या सहकार्यातून काढण्यात आली. गेल्या कित्येक वर्षांपासून पुसेगाव परिसरात संजू नावाची एक व्यक्ती राहत होती. हटके स्वभावाचा असल्याने संजूच्या कोणी नादाला लागत नव्हते. त्याची पूर्ण पुसेगाव शहर व परिसरात भीती होती. तसा तो मनोरुग्ण नव्हता. फक्त जगायचं कस हे विसरला होता. साधारण 15 वर्ष तरी अंघोळ नसावी इतकया केसाच्या जटा इतक्या वाढल्या होत्या.
रात्री युवा संकल्प सोशल फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी या संजूला माणसात आणण्याचा संकल्प केला. त्याला परिसरात शोधण्यास सुरुवात झाली. सगळीकडे चौकशी केली. त्याच्या शोधार्थ सगळे सदस्य फिरत होते. अखेर त्याला शोधून काढले. यानंतर त्याचे संपूर्ण केस कापण्यात आले तसेच दाढीही करण्यात आली. केस व दाढी मिळून साधारण 3 किलो भरेल इतकी केस जटा निघाली. यानंतर त्याला पूर्ण स्वच्छ केले. या घटनेमुळे माणुसकी अजून जिवंत असल्याचा प्रत्यय आला. आजही समाजात कितीतरी स्त्री-पुरुष, व्यक्ती अंधश्रद्धांच्या आहारी जाऊन आपल्या केसांच्या जटा वाढवतात आणि यातूनच भिक्षा मागून जीवन जगण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.