पुणे विभागातील 16 रेल्वे स्थानकांवर “फ्री वाय-फाय’

पुणे – प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील 16 रेल्वे स्थानकांवर “फ्री वाय-फाय’ सेवा सुरू करण्यात आली आहे. स्थानकावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार असून येत्या काळात इतर स्थानकांवर ही सेवा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

स्थानकांत येणाऱ्या हजारो प्रवाशांना मोफत वायफाय सेवा देण्याची शासनाची योजना आहे. यानुसार पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, वलीवडे, मिरज, सांगली, कराड, कोरेगाव, सातारा, जेजुरी, राजेवाडी, लोणद, हातकणंगले, भिलवडी, वाठार, राजेवाडी, पळसी, नीरा या स्थानकांत ही सेवा सुरू केली आहे. त्याचबरोबर पुणे ते मळवली दरम्यान येणाऱ्या स्थानकांवर फ्री वाय- फाय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या स्थानकांवर वायफायचे काम सुरू असून लवकरच सेवा सुरू केली जाईल, असे प्रशासनाच्या वतीने नमूद करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)