आरे कॉलनीत मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा 

हायकोर्टाने विरोध करणारी याचिका फेटाळली

मुंबई – मुंबई मेट्रो-3साठी आरे कॉलनीतील प्रजापूर व वेरावली येथील देण्यात आलेल्या 33 हेक्‍टर भुखंडाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका उच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. या भुखंडासंदर्भात देण्यात आलेल्या निर्देशांनुसार एमएमआरसीने आश्वासनांची पूर्तता केली नाही, तर महापालिकेने योग्य ती कारवाई करावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या निर्णयामुळे मेट्रो-3च्या आरे कॉलीनीतील कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्य सरकारने 2034च्या विकास आराखड्यात आरे कॉलनीच्या सुमारे 81 एकराहून अधिक असलेल्या भुखंडापैकी सुमारे 33 हेक्‍टरचा भूखंड मेट्रो कारशेडसाठी देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात पर्यावरणवादी आणि आरे संवर्धन समूहाच्या सदस्या अमृता भट्टाचार्जी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती पी. डी. नाईक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने राखून ठेवलेला निर्णय आज जाहिर केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुंबई मेट्रो-3च्या प्रकल्पासाठी आरे कॉलनीत झाडे व पर्यावरणाचे मोठे नुकसान करून कारशेड बांधले जात आहे. मुंबईसाठी एकप्रकारे फुप्फुसांचे काम करत असलेली आरे कॉलनीतील जमीन ही पूर्णपणे ना विकास क्षेत्र असताना या परिसरातील 33 हेक्‍टर जमीन मनमानी पद्धतीने मेट्रो कार शेडसाठी राखीव करण्यात आली आहे, असा आरोप करणारी याचिककर्त्यांनी केला होता. तर आरे कॉलनीतील भुखंड कारशेडला देण्याचा निर्णय घेण्यापूर्वी राज्य सरकारने सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच हस्तांतरीत करण्यात आली.

मात्र हे करतानाही पर्यावरणाला कोणताही धोका पोहचणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली जाईल, अशी ग्वाही मुंबई मेट्रो रेल प्राधिकरणाने न्यायालयात दिली होती. तसेच राज्य सरकारने विकास आराखड्यात केलेल्या बदलांनुसार संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एकूण 165 हेक्‍टर जमीन ही पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या भागातून वगळण्यात आली आहे. त्यात मेट्रो कारशेडला देण्यात आलेल्या 33 हेक्‍टर जमीनही समाविष्ठ आहे. याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. उभय पक्षांच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)