#AirStrike : सलाम पट्ठ्याला! ‘पुलवामा’चा बदला घेतला म्हणून दिवसभर रिक्षा चालवली मोफत!

दिल्ली : भारतीय वायुसेनेने आज पाकव्याप्त काश्मिरातील जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या प्रशिक्षण तळावर हवाई हल्ला चढवत जैशच्या ३००हून अधिक दहशतवाद्यांना यमसदनी धाडले आहे. पाकिस्तान पुरस्कृत असलेल्या याच दहशतवादी ‘जैश’ संघटनेच्या आतंकवाद्यांनी १४ फेब्रुवारी रोजी भारतीय राखीव सुरक्षा दलाच्या ताफ्यावर भ्याड हल्ला चढवत ४० जवानांचे प्राण घेतले होते. गेल्या दशकातील भारतीय सुरक्षा दलांवर झालेला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. पाकिस्तानच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या कुरापतींमुळे भारतीय समाजामध्ये पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलण्याची भावना होती.

दरम्यान आज भारतीय वायुसेनेने पुलवामा हल्ल्याचा बदला घेत भारतीयांच्या मनामध्ये खदखदणारा आक्रोश शांत केला आहे. भारतीय वायुसेनेच्या याच कामगिरीवर खुश होत दिल्ली येथील एका रिक्षा चालकाने आपला आनंद आगळ्या-वेगळ्या पद्धतीने व्यक्त केला आहे. मनोज नावाच्या या रिक्षाचालकाने आज दिवसभर आपली रिक्षा फुकट चालवत भारतीय वायुसेनेच्या कार्याला नमन केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/ANI/status/1100404241565331457

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)