दुष्काळग्रस्त गावांतील विद्यार्थ्यांना मोफत बस पास

संगमनेर आगारातर्फे पास वितरणास प्रारंभ : सहा महिन्यांसाठी योजना राहील सुरू

तीन दिवसांत एकहजार पासचे वितरण

शासननिर्णयानुसार मोफत शैक्षणिक प्रवास सवलत योजनेत परिवहन महामंडळाकडून मंगळवारपासून विद्यार्थ्यांना पास वितरण करण्यास सुरवात झाली आहे. संगमनेर पास केंद्रातून तीन दिवसांत सुमारे एकहजारांच्या आसपास विद्यार्थ्यांना पासचा लाभ देण्यात आला आहे.

संगमनेर – राज्य शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्‍यांतील शालेय विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या माध्यमातून मोफत प्रवास सवलत योजनेचे पास वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार संगमनेर तालुक्‍यातील विद्यार्थ्यांना या योजनेतील मोफत पास वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

-Ads-

संगमनेर बसस्थानकात 20 नोव्हेंबरपासून सुविधा केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना पासचे वितरण करण्यात येत आहे. मासिक पास संपलेले असलेल्या विद्यार्थ्यांनी तत्काळ पास वितरणाला सुरुवात करण्यात आली. या केंद्रावर जुने मासिक पास जमा करून विद्यार्थ्यांना निर्धारित केलेल्या मार्गावरील दुष्काळी स्थितीचे मोफत पास उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

नवीन पास घेण्यासाठी संगमनेर बसस्थानकावर विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. तालुक्‍यातील सुमारे आठ हजार विद्यार्थ्यांना या विशेष योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. सन 2018-19 च्या उर्वरित शैक्षणिक सत्रासाठी शालेय, महाविद्यालयीन व व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेत सामावून घेण्यात आले आहे. पासधारक विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या या लाभामुळे दुष्काळी परिस्थितीत मोठा दिलासा मिळणार आहे.

सध्या राज्य परिवहन मंडळाकडून शैक्षणिक पाससाठी 66.67 टक्के सवलत देऊन उर्वरित 33.33. टक्के रक्कम विद्यार्थ्यांकडून घेतली जाते. मात्र दुष्काळी स्थितीमुळे शैक्षणिक सत्रासाठी शासननिर्णया नुसार विद्यार्थ्यांना रक्कम न भरता मोफत प्रवास पास देण्यात येणार आहे. 15 नव्हेंबर 2018 ते एप्रिल 2019 या 6 महिन्यांसाठी या मोफत प्रवास सवलत योजनेचा लाभ दुष्काळी जाहीर झालेल्या तालुक्‍यांतील विद्यार्थ्यांना मिळणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)