फिफा विश्वचषक : उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेशासाठी फ्रान्स व अर्जेंटिनाचा संघ भिडणार

फुटबॉल वर्ल्डकपचा रंग पूर्ण जगभरावर चढला असून ‘नॉकआऊट’ सामन्यांना सुरवात येत्या शनिवारपासून होत आहे. फ्रान्स आणि अर्जेंटिनाचा या दोन बलाढ्य संघांनी  ‘टॉप १६’ मध्ये आपली जागा पक्की केली असली तरी अजूनपर्यंत त्यांना आपल्या छबीस ‘साजेसा’ खेळ करता आला नाही.
फ्रान्स व अर्जेंटिना तब्बल ४० वर्षांनंतर सॉकरच्या या कुंभमेळाव्यात आमने सामने येणार असून बाद फेरीचा हा पहिलाच सामना ठरणार आहे.  स्टार प्लेयर्सचा भरणा असलेल्या या दोन्ही संघांची लढत फुटबॉल रसिकांसाठी पर्वणीच ठरणार आहे.
फ्रान्सने आपल्या गटातून एकही सामना न गमावता बाद फेरीत प्रवेश केला असला तरी त्यांचा भरवशाचा स्ट्रायकर अँटोनी ग्रीझमॅन याचे आतापर्यंतचे निराशाजनक प्रदर्शन संघासाठी निश्चितच चिंतेची बाब ठरत आहे.
तर दुसऱ्या बाजूस अर्जेंटिनाचा संघाचा आतापर्यंतचा प्रवास खडतर राहिला आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)