हाॅकी विश्वचषक स्पर्धा 2018 : दुबळ्या फ्रान्स संघाचा अर्जेंटिनाला धक्का

भुवनेश्वर – सर्वात दुबळा समजल्या जाणाऱ्या फ्रान्सच्या हाॅकी संघाने अ गटातील लढतीत ऑलिंपिक चॅम्पियन अर्जेंटिनाला 5-3 ने पराभूत करत हाॅकी विश्वचषकाच्या क्राॅसओव्हर मध्ये प्रवेश केला आहे. तर पराभवानंतरही अर्जेंटिनाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

न्यूझीलंड आणि स्पेन यांच्यातील सामना 2-2 ने बरोबरीत सुटल्याने जागतिक क्रमवारीत 20 व्या स्थानावर असलेल्या फ्रान्सला या सामन्यात जिंकणे गरजेचे होते. जिंकण्याच्या इराद्याने फ्रान्सचा संघ मैदानात उतरला होता आणि त्यांनी उलटफेर करत अर्जेंटिनावर विजय मिळविला.

फ्रान्सकडून ह्यूगो जेनेस्टेट (18 मि.), अरिस्टाइड कोइसेन (26 मि.), गैस्पार्ड बाउमगार्टन (30 मि.), फ्रैंकोइस गोएट (54 मि.) आणि विक्टर चार्लेटने (23 मि) पेनल्टी काॅर्नर व्दारा गोल केला. तर पराभूत संघाकडून लुकास मार्टिनेज (28 मि.), गोंजालो पेलियटने (44 आणि 48 मि.) पेनल्टी काॅर्नरव्दारे गोल केला.

स्पेनचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. तर फ्रान्स आणि न्यूझीलंड उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यासाठी क्राॅसओव्हरमध्ये खेळतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)