चौंडीत आढळला अल्पवयीन मुलीचा जळालेला मृतदेह

आठ दिवसांपासून होती बेपत्ता

जामखेड: आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या जामखेड तालुक्‍यातील चौंडी येथे एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह जळालेल्या व कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

आरती पांडुरंग सायगुडे (वय 17) असे मृत मुलीचे नाव आहे. सदर मुलगी चौंडी येथील रहिवासी होती. आरतीचे वडील पांडुरंग सायगुडे यांनी 24 मार्च रोजी जामखेड पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली होती. आरती ही कर्जत तालुक्‍यातील चापडगाव येथील महाविद्यालयात शिकत होती. तेथूनच ती आठ दिवसांपासून बेपत्ता होती. त्यानंतर आज सकाळी तिचा मृतदेह चौंडी येथील सायगुडे वस्तीजवळ गोवर्धन हरीभाऊ शिंदे यांच्या शेताजवळ कुजलेल्या काही भाग कुत्र्यांनी खाल्लेल्या अवस्थेत तलाव परिसरात आढळून आला. मुलीचा मृत्यू ही आत्महत्या की घातपात, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आसल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे यांनी जागेवरच उत्तरीय तपासणी केली. पोलीस उपनिरीक्षक गोरे तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)