कर्नाटकमधील कॉंग्रेसच्या चार बंडखोर आमदारांची अधिवेशनाला हजेरी 

बंगळूर – अनेक दिवसांपासून गायब राहून कॉंग्रेसचे टेन्शन वाढवणारे कर्नाटकमधील चार बंडखोर आमदार बुधवारी समोर आले. त्यांनी विधिमंडळाच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनाला हजेरीही लावली. त्यामुळे त्या राज्यातील सत्तारूढ कॉंग्रेस-जेडीएस आघाडीला काही प्रमाणात दिलासा मिळाला.

मागील काही दिवसांपासून कर्नाटकमधील आघाडी सरकारवर धोक्‍याची टांगती तलवार लटकत आहे. सरकार पाडण्यासाठी भाजप सत्तारूढ आघाडीचे आमदार गळाला लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप कॉंग्रेस आणि जेडीएसकडून केला जात आहे. अशातच काही आठवड्यांपासून रमेश जारकीहोली, उमेश जाधव, बी. नागेंद्र आणि महेश कुमाथली हे आमदार कॉंग्रेसच्या संपर्क क्षेत्राबाहेर गेले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाच्या दोन बैठकांना उपस्थित राहण्याचा आदेशही त्यांनी डावलला. अखेर कॉंग्रेसने त्या चौघांना अपात्र ठरवण्याची शिफारस विधानसभेच्या सभापतींकडे केली. त्यानंतर दोन दिवसांनी समोर येत त्या आमदारांनी अधिवेशनाला हजेरी लावली. अर्थात, पक्षावर नाराज असल्याचे पुरेसे संकेत त्यांनी दिले. काही दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यात स्थान न मिळाल्याने संबंधित आमदार नाराज आहेत. अनेक दिवस ते मुंबईत तळ ठोकूून होते. आता ते आणि कॉंग्रेस आगामी काळात कोणती पाऊले उचलणार याबाबत उत्सुकता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)