प्रतापपुरात रात्रीतून चार ठिकाणी चोऱ्या

संगमनेर – तालुक्‍यातील प्रतापपूर येथील भाऊसाहेब बर्डे, शिवनाथ सांगळे, सुधाकर सांगळे व हरिभाऊ आंधळे यांच्या घरावर गुरुवारी (4 जुलै) मध्यरात्री चोरट्यांनी डल्ला मारत सुमारे 1 लाख 91 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेल्यामुळे प्रतापपूर परिसरात भीतीचे वातावरण आहे.

भाऊसाहेब बर्डे यांनी आश्‍वी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गुरुवारी रात्री नऊ वाजता मी व माझे कुटुंबीय हॉलमध्ये झोपलो होतो.
शुक्रवारी (5 जुलै) सकाळी उठलो असता घराच्या किचनचा दरवाजा उघडा दिसला.

त्यामुळे आतमध्ये जाऊन पाहिले असता किचनमधील डब्याची व बेडरुममधील कपाटाची उचक-पाचक करुन 75 हजार रुपये किमंतीचे तीन तोळे सोन्याचे दागिने व 13 हजार पाचशे रुपये रोख चोरट्यांनी चोरुन नेल्याचे आढळले. तसेच शेजारी राहणारे शिवनाथ सांगळे यांच्या पॅन्टीच्या खिशातून 2 हजार रुपये, सुधाकर सांगळे यांच्या घरातून 24 हजार रोख, सोन्या व चांदीचे 76 हजार पाचशे रुपये किंमतीचे दागिने घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. तर हरिभाऊ आंधळे यांच्या कंपाऊंडच्या गेटचे कुलुप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. एकूण 1 लाख 91 हजाराचा मुद्देमाल चोरुन नेला असल्याचे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तर आश्‍वी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)