फसवणुकीच्या आरोपाखाली मंत्री दिलिप कांबळेंसह चौघांवर गुन्हा दाखल

‘वाईन शॉप’चा परवाना मिळवून देण्याचे आमीष दाखवून तब्बल दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालिन राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सध्या सामाजिक न्यायमंत्री पदावर असलेल्या दिलीप कांबळेयांच्यासह चौघांवर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबाद कोर्टाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणातील एक आरोपी दिलीप काळभोर याचा अटकपूर्व जामीन अर्ज देखील जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी फेटाळला. फसवणूक केल्याप्रकरणी विलास चव्हाण यांनी तक्रार दिली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)