पणजी : गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तसेच गोव्याचे उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांच्यासह चार मंत्र्यांचे राजीनामे दिले. भाजपकडून या मंत्र्यांना आदेश दिल्याचे सांगण्यात येत आहे. सरदेसाई यांच्यासह जयेश साळगावकर,विनोद पालयेकर आणि अपक्ष रोहन खंवटे यांनी या आदेशानंतर आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. या मंत्र्यांना केंद्रातून आदेश दिले असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. तर नव्या चार मंत्र्यांचा आज शपथविधी होणार आहे.
सरकारमधील गोवा फॉरवर्डचा सहभाग दोन वर्ष आणि चार महिन्यानंतर आता संपुष्ठात येणार आहे. मार्च 2017 मध्ये मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार स्थापण करण्यात आले होते.2017 मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजप आणि कॉंग्रेस यांना बहुमत मिळाले नव्हते. तसेच निवडणुकांमध्ये भाजपाला 17 जागांवर विजय मिळाला होता. परंतु, 10 जणांचा गट नुकताच भाजपात विलीन झाला आहे. त्यामुळे आता भाजपचे संख्याबळ वाढून आता 27 झाले आहे. दरम्यान, गोवा फॉरवर्ड पक्षाच्या तीन आमदारांनी यापुर्वीच भाजपाला समर्थन दिले होते. त्यामुळे कॉंग्र्रेसकडे आता केवळ 5 आमदार राहिले आहेत. त्यामुळे भाजपला आता कोणाच्याही समर्थनाची गरज नसल्याचे स्पष्ट झाले आहे.