सिडनी- ऑस्ट्रेलियातील डारविन शहरामध्ये 45 वर्षीय गृहस्थाने केलेल्या स्वैर गोळीबारामध्ये 4 जण ठार झाले आहेत. ही घटना मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास घडली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून आता कोणाच्याही जिवीताला धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ही घटना म्हणजे दहशतवादी हल्ला समजला जाऊ नये, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. 4 जून 2019 हा दिवस “नॉर्दर्न टेरिटोरी’साठी भयप्रद ठरल्याचे या प्रांताचे मुख्यमंत्री मायकल गन्नर यांनी पत्रकारंना सांगितले.
एकूण 5 ठिकाणी गोळीबार झाला. त्यामध्ये चौघेजण ठार झाले, तर एक जण जखमी झाला. हल्ल्यानंतर हल्लेखोर सुमारे 4 तस् मोकाट फिरत होता. त्यानंतर त्याला पकडण्यात यश आले. एका मॉटेलमध्ये प्रत्येक खोली उघडून तो गोळीबार करत सुटला होता, असे प्रत्यक्ष साक्षीदाराने सांगितले. हल्लेखोर हा ज्ञान गुन्हेगार असून तो जानेवारीमध्येच तुरुंगातून सुटला होता. या हल्ल्यामागे त्याचा हेतू अद्याप स्पष्ट व्हायचा आहे.
पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी या स्वैर गोळीबाराच्या घटनेवर तीव्र टीका केली आहे आणि मृतांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे.